👁 10 Views

बलशाली भारताच्या निर्मितीची ज्योत चिमूरमधून पेटू द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व 
Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 16  August 2017 

अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय पोलीस कार्यालय निर्मितीची घोषणा
चिमूर, दि. १६ : 1942 च्या चलेजाव आंदोलनानंतर भारतामध्ये चिमूरने स्वातंत्र्याची ज्योत पेटविली होती. तेव्हा इंग्रजाविरुद्ध लढून त्यांना हद्दपार करण्याची लढाई आम्ही जिंकलो आहे . आता चिमूर मधून बलशाली नव भारताच्या निर्मितीची ज्योत पेटवू या असे भावपूर्ण आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शहिदांना आदरांजली व्यक्त केल्यानंतर लाखोंच्या जनसमुदायाला येथील बीपीएड महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांनी संबोधित केले .
            सभेपूर्वी त्यांनी चिमूर येथील शासकीय हुतात्मा शहीद स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर किल्ला परिसर येथे चिमूर शहिदांच्या स्मृतीस श्रध्दांजली पुष्पचक्र अर्पण केले.
            यावेळी अर्थ  नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारजलसंपदा मंत्री गिरीश महाजनवन राज्यमंत्री राजे अंबरिशराव आत्रामवन विकास महामंडळाचे अध्यक्ष चांदनसिंग चंदेलजिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळेखासदार अशोक नेतेआमदार मितेश भांगडीयाआमदार नाना शामकुळेमहापौर अंजली घोटेकरआयोजक आमदार किर्तीकुमार भांगडीयाविभागीय आयुक्त अनूपकुमार,जिल्हाधिकारी आशुतोष सलिलजिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकरमुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकरनगराध्यक्ष शिल्पा राचलवारमाजी मंत्री संजय देवतळेमाजी आमदार अतुल देशकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
            यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारताच्या इतिहासात चिमूरच्या स्वातंत्र्य लढ्याचे महत्व विषद केले. संपूर्ण स्वराज्याचा चलेजाव हा नारा चिमूरने बळकट केल्याचे त्यांनी सांगितले. करो या मरो या नाऱ्याने आम्हाला स्वातंत्र मिळाले आता करो या मरो या भूमिकेतून आम्हाला सुराज्य निर्माण करायचे आहे. आता हा नारा आम्ही राज्यकर्ते देणार आहोत,त्यासाठी आता आम्ही लढणार आहोत यावेळी फक्त तुमची साथ हवी आहे असे आवाहन त्यांनी केले.
            चिमूर जिल्ह्याच्या प्रलंबित मागणीचा अनेक नेत्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला होता. तो धागा पकडत मुख्यमंत्री म्हणालेराज्यातील प्रलंबित जिल्ह्याच्या मागणीसाठी एक समिती काम करत आहे. या समितीच्या शिफारशी नंतर सर्व नव्या जिल्ह्यासोबत चिमूर जिल्ह्याची घोषणा केली जाईल. तथापि आजचा क्रांती मेळावा आयोजित करणारे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी मागणी केल्याप्रमाणे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय पोलीस कार्यालय निर्मितीची आज आपण घोषणा करत असल्याचे त्यांनी सांगितले. नवनिर्मित चिमूर आणि नागभीड नगर पालिकांना भरघोस आर्थिक मदत केली जाईलअशी घोषणा मुख्यमंत्री यांनी केली. याशिवाय स्व. गोटूलाल भांगडीया स्मृती रुग्णालय निर्माण केल्याबद्दल त्यांनी भांगडीया परिवाराचे अभिनंदन केले. सोबतच मोखा नाला या ठिकाणच्या साडेसात हजार हेक्टर शेतीचे सिंचन करणाऱ्या सूक्ष्म सिंचन प्रकल्पाला मर्यादित वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
            यावेळी बोलताना राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नव्या भारत निर्मितीसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदय संकल्पनेला मजबूत करण्याची गरज असल्याचे संगितले. क्रांती भूमीतून आता नक्षलवादआतंकवाद,जातीयवादभ्रष्टाचारगरिबी चले जाव‘ चा नारा बुलंद झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
            या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी प्रधानमंत्री सिंचन योजनेतून चिमूरसह विदर्भातील प्रलंबित प्रकल्पनांना तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे सुतोवाच केले. याप्रसंगी खासदार अशोक नेते व आमदार मितेश भांगडीया यांची भाषणे झाली. प्रास्ताविक आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी चिमूर जिल्हा निर्मितीची तसेच नव्या नगर पालिकांना निधीची मागणी केली.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वतंत्र संग्राम सैनिकांच्या वारसांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन प्रशांत आरवे व रेणुका देशकर यांनी केले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *