👁 10 Views

उच्च स्वप्ने उराशी बाळगून त्यास कष्टाची जोड दिल्यास ध्येयप्राप्ती..! पंढरपूरचे उपविभागीय पोलीसअधिकारी निखील पिंगळे यांचे प्रतिपादन..

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,

  • पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


पंढरपूर Live 17  August 2017 

71 वा भारतीय स्वातंत्र्यदिन रत्नमहर्षि व क्वालिटी स्कुलमध्ये उत्साहात



आव्हे येथील रत्नमहर्षि विद्यालय व क्वालिटी इंग्लिश स्कुलमध्ये भारताचा 71 वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्सहात पार पडला. या मेळाव्यास पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी निखील पिंगळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक नवनाथभाऊ जगताप हे होते. आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना संबोधीत करताना पिंगळे यांनी सांगितले की, शिस्त, चिकाटी, शांतता, जिद्द इ. मुल्य जपली तर यश निश्‍चितच मिळते. मुलांनी उच्च स्वप्ने उराशी बाळगून त्यास कष्टाची जोड दिल्यास ध्येयप्राप्ती शंभर टक्के होते. पिंगळे यांनी आपल्या आयुष्यातील कांही कठीण प्रसंग सांगत त्यावर आपण कशी मात केली..! हा अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला.
यावेळी डॉ. बाळकृष्ण नष्टे यांनीही विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी कानमंत्र दिला.

यावेळी काही विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यालयाने भरवलेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, दहावी बोर्ड परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांनी अभिनंदन व कौतुक केले. यावेळी श्री.पिंगळे यांनी शाळेतील वर्गांची पाहणी करत शाळेने शैक्षणीक क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीचे निरीक्षण केले.

या कार्यक्रमाप्रसंगी किसन महादेव जगताप (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक), मुरलीधर दिगंबर शेटे(पंढरपूर नगरपरिषद जमादार) यांचा विद्यालयाच्या वतीने सेवानिवृत्तीबद्दल सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास जगताप, मार्कट कमिटी संचालक व सरपंच बिटू कटवट, माजी सरपंच लहु यमगर, मेजर कांबळे, तलाठी, ग्रा.पं.सदस्य, पालक, माजी विद्यार्थी तसेच संचालक युवराज जगताप आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रक्षाळे मॅडम, सुत्रसंचलन होरे सर तर आभार घोडे सर यांनी केले.      

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *