👁 6 Views

मिरजेतल्या दुय्यम बाजार आवारातील शेतकरी खाटीक यांच्यासाठी पायाभूत सुविधा साकारणार:- सभापती प्रशांत शेजाळ

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,

  • पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 18  August 2017 

मिरज दुय्यम बाजार आवारातील शेळी, मेंढी बाजारामध्ये पायाभूत सोयी सुविधा व अन्य मागण्यांची पूर्तता करण्यास सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली तयार असल्याचे आश्वासन समितीचे सभापती श्री प्रशांत रामचंद्र शेजाळ यांनी दिले आहे.

   महाराष्ट्र राज्य मुस्लिम खाटीक संस्थेचे अध्यक्ष सादिक पापामियॉ खाटीक (आटपाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली ४० जणांच्या शिष्टमंडळाने आज मिरज येथे दुय्यम बाजार आवारात बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यासमवेत स्थळ पाहणी करून विविध मागण्या सादर केल्या. पंधरा दिवसापूर्वी दिलेल्या निवेदनातील मागण्यांसह अन्य काही मागण्या नोंदविल्या.
    मिरज दुय्यम बाजार आवाराच्या उत्तरबाजुस कायमस्वरूपी बेड कॉक्रीटचे १७ लाख ९२हजार ८६० किमतीचे काम करुन पावसाळ्यात होणाऱ्या चिखलापासुन बाजार आवार मुक्त करीत आसल्याचे स्पष्ट केले. पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडून यासाठी मान्यता घेतल्याचे सांगितले.

   सध्या आवारातले एक निवारा शेडची तातडीने दुरुस्ती करुन घेत असल्याचे स्पष्ट करुन बाजारात येणाऱ्या शेतकरी, व्यापारी, खाटीक बांधव यांच्यासाठी पुरेशी संख्येत “संडास-बाथरूम” लवकर उभी करत आहोत तसेच खास बकरी ईदच्या कुर्बानीच्या बोकडांच्या बाजारा संदर्भात पुरेशी लाईट व्यवस्था आणि सध्या अस्तित्वात असलेल्या अन्य व्यवसायीकांच्या साठीच्या बेड कॉक्रीटच्या जागेची व्यवस्था दोन आठवड्यासाठी खास उपलब्ध करून देत असल्याचे सभापती श्री. शेजाळ यांनी सांगितले.
  बकरी बाजार आवारातील स्वच्छता, साफ, सफाई वर विशेष लक्ष देत असल्याचे स्पष्ट करून शेतकरी निवास CCTV , लाईट व्यवस्था, माणसे आणि जनावरांसाठी स्वच्छ व स्वतंत्र पाणी व्यवस्था इत्यादी बाबतचे विषय समीती सभेपुढे घेऊन संबंधित खात्याच्या मंजुरीनंतर तात्काळ पुर्ण करण्याचा आपला मानस आसल्याचे श्री.शेजाळ यांनी स्पष्ट केले. संपूर्ण बकरी बाजार आवार जागेवर उन, पाऊस यापासुन रक्षण करणारे रक्षक शेड उभारण्यासाठीही भविष्यात प्रयत्न सार्थकी लावण्याचे अभिवचन ही त्यांनी दिले.
   यावेळी बाजार समितीचे मुख्य सचिव प्रकाश पाटील, संचालक अर्जुन बनसोडे, जि.प सदस्य माणिकराव भोसले, दुय्यम बाजार आवार समीती मिरजचे सभापती वसंत बापु गायकवाड, सहाय्यक सचिव व्ही.जे राजेशिर्के, भिमराव पाटील, अनिल कदम, मैनूद्दीन उर्फ मुन्नाभाई पटेल, प्रा.आखलाक ताडे, मुजाहिद खाटीक, पप्पू पटेल, हा.आय्युब पटेल, महेरबक्ष दर्गावाले, आय्युब.दा. खाटीक, इंजी.आसिफ कलाल, अब्दुल(गाजा) खाटीक, फिरोज खाटीक, आबिद दर्गावाले, तौहीद पटेल, नईम खाटीक, हा.नुरमहंमद रहिमतपुरे, फैयाज खाटीक, जमीर पटेल, सुलतान पटेल, चंदुलाल खाटीक, समीर पटेल, रफिक अ.खाटीक, जमीर खाटीक, दिलावर खाटीक, म.गौस (नाना) खाटीक, महिबुब खाटीक, हा.जब्बार पटेल, सादीक पटेल, नवमान पटेल इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *