👁 7 Views

अबब! नारळ यावर्षी तब्बल 40 टक्‍क्‍यांनी महाग झाले..!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 21 August 2017 

    पुणे, दि. 21 – पुजा, सत्कार, मिठाईपासून अगदी घरगुती वापरासाठी आवश्‍यक असलेल्या नारळाच्या भावात यावर्षी सुमारे 30 ते 40 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. श्रावण महिन्यातील विविध सण, गणेशोत्सवामुळे मागणी वाढल्यामुळे या महिन्यात मार्केट यार्डात नारळाच्या भावात 10 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. नेहमीच्या तुलनेत नारळाची झालेली कमी लागवड, प्रक्रिया उद्योगांकडून वाढली मागणी, या कारणामुळे नारळाचे भाव कडाडल्याची माहिती व्यापारी दीपक बोरा यांनी दिली.
    मार्केट यार्ड येथील भुसार बाजारात आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूतू येथून नारळाची आवक होत असते. गेल्या वर्षी या नारळ उत्पादक राज्यांमध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे तेथे नेहमीच्या तुलनेत नारळाची कमी लागवड झाली होती. परिणामी नारळाचे उत्पादन घटले. त्यामुळे नारळाच्या भावात गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 ते 40 टक्कयांनी वाढ झाली आहे. जळगाव, नगर, नाशिक आणि खानदेशामध्ये श्रावण पोळा मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. त्यामुळे दरवर्षी या भागातून नारळाला मोठी मागणी असते. तशी यावर्षीही नारळाला मागणी आहे. त्यानंतर आता गणोशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर ही वाढलेली मागणी कायम राहण्याचा अंदाज बोरा यांनी वर्तविला आहे. ते म्हणाले, शहरातील मार्केटयार्डात दररोज 10 ते 15 गाड्या नारळाची आवक होत आहे. याप्रकारे साधारण तीन लाख नारळ बाजारात दाखल होत आहे. सध्या होणारी ही आवक समाधानकारक आहे. 

    8308838111

    मात्र, आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने नारळाच्या भावात वाढ झाली आहे. जवळपास चार प्रकारचे नारळ बाजारात उपलब्ध असतात. तामिळनाडूचा नवा नारळ हा धार्मिक विधीसाठी वापरण्यात येतो. हा नारळ आकाराने छोटा आणि मध्यम असतो. तर, आंध्र प्रदेशचा पालखोल तसेच मद्रास नारळास किराणा दुकानदारांकडून मोठी मागणी राहते. हा नारळ स्वयंपाकघरात वापरला जातो. कर्नाटक नारळ आकाराने मोठा आणि जाड, खोबरे चवीला उत्तम असल्याने हॉटेल व्यावसायिक खानावळ, केटरिंग व्यवसायाकडून या नारळाला मोठी मागणी असते. सध्या सर्व प्रकारच्या नारळाला मागणी वाढली असून अद्याप त्याचा तुटवडा निर्माण झालेला नाही. गेल्या वर्षी किरकोळ बाजारात नारळाचा प्रती नगाचा भाव हे 6 ते 8 रुपये असे होते. आता मात्र, ते 11 ते 30 रुपयांपर्यंत पोहोचले असल्याचेही बोरा यांनी सांगितले.

    घाऊक बाजारातील नारळाचे प्रति शेकडा भाव
    नारळाचे प्रकार जुलै 2016 जुलै 2017
    मद्रास 1500 ते 1550 2400 ते 2550
    नवा माल 650 ते 700 1200 ते 1300
    पालखोल 850 ते 900 1400 ते 1500

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *