👁 12 Views

राजेवाडी येथील सद्गुरू श्री.श्री.साखर कारखाना व कॅनरा बँकेच्या सांगली शाखेने परस्पर कर्जे काढून फसवणूक

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 21 August 2017 

    इस्लामपूर दि.20 प्रतिनिधी
    आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील शेतकऱ्यांनी माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांची इस्लामपूर येथे भेट घेऊन राजेवाडी येथील सद्गुरू श्री.श्री.साखर कारखाना व कॅनरा बँकेच्या सांगली शाखेने परस्पर कर्जे काढून आमची फसवणूक केली आहे,आपण आम्हास न्याय दयावा,असे साकडे घातले. आ.पाटील यांनी तातडीने जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्याशी संपर्क करून यामध्ये लक्ष घालण्याच्या सूचना केल्या. त्यांनी विशेष पोलीस अधिकाऱ्यां मार्फत चौकशी करू,अशी ग्वाही दिली आहे. जर आपणास न्याय मिळाला नाही,तर आपण या विषयावर विधानसभेत आवाज उठवू,असा शब्द आ.पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला. 
    सद्गुरू श्री.श्री.साखर कारखान्याने राजेवाडी येथील 19 शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कॅनरा बँकेच्या सांगली शाखेतून 29 लाख 44 हजार रुपयांची कर्जे उचलली आहेत. या शेतकऱ्यांना कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद करताना कारखान्याने घेतलेल्या मतदान ओळखपत्र,आधार कार्ड,रेशन कार्ड,7/12 चा या कागदपत्रांचा,तसेच शेतकऱ्यांच्या खोट्या सही,अंगठ्याचा उपयोग करून हे बोगस कर्ज उचलेले असल्याचे शेतकऱ्यांनी आ.पाटील यांना सांगितले. ही बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास येताच,त्यांनी आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन कारखाना व बँकेच्या विरोधात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. प्रथम तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. यावेळी आटपाडीचे सामाजिक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी आ.पाटील यांच्याशी संपर्क केल्यानंतर पोलिसांनी ही तक्रार नोंदवून घेतली आहे. या शेतकऱ्यांनी आ.पाटील यांच्याकडे निवेदनाबरोबर प्रत्येक शेतकऱ्यांचा कर्ज उतारा,सेव्हिंग खाते उतरा जोडला आहे.
    या शिष्टमंडळामध्ये सामाजिक कार्यकर्ते सादिक खाटीक,राहुल पुजारी,अरुण मंडलिक,विकास सोसायटीचे चेअरमन रवींद्र शिरकांडे, माजी चेअरमन श्रीमंत शिरकांडे,बाबासाहेब देशमुख सह. बँकेचे चेअरमन बाळासाहेब पाटील,माजी सरपंच सिद्धेश्वर सातपुते,तानाजी जरग,बाजार समितीचे संचालक विलास गलांडे,उमाजी चव्हाण, सुभाष सातपुते,बाळासाहेब पुजारी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा समावेश होता. 
    तीन तालुक्यातील शेतकरी चिंतेत!
    राजेवाडी येथील 19 शेतकऱ्यांचे बोगस प्रकरण निदर्शनास आल्याने आटपाडी तालुक्यासह शेजारच्या माण (जि.सातारा), माळशिरस (जि.सोलापूर) या तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहेत. राजेवाडीच्या शेतकऱ्यांप्रमाणे आणखी किती शेतकऱ्यांच्या नावावर असे कर्ज उचलले आहे?,तसेच कॅनरा बँके प्रमाणे आणखी किती बँका यामध्ये सहभागी आहेत?अशी काळजी या परिसरातील शेतकऱ्यांना लागल्याचे राजेवाडीच्या शेतकऱ्यांनी आ.पाटील यांना सांगितले.
    फोटो ओळी- इस्लामपूर येथे माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांना भेटून आपल्या फसवणुकीची माहिती देताना आटपाडीचे सादिक खाटीक, व राजेवाडीचे कार्यकर्ते,शेतकरी.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *