👁 12 Views

अनिल कपूरला बघताच सनी देओलचा व्हायचा संताप; सेटवरच दाबला होता गळा!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 23 August 2017 



    सनी देओलला अनिल कपूरचा ऐवढा राग येत होता की, ‘जोशीले’च्या सेटवर त्याने अनिलचा चक्क गळा दाबला होता.

    सनी देओलचे नाव समोर येताच आपल्या डोक्यात त्याच्या अनेकप्रकारच्या छबी निर्माण होतात. ‘घायल, घातक, दामिनी, गदर आणि इंडियन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारा सनीपाजी त्याच्या डॅशिंग अंदाज आणि डायलॉग्ससाठी ओळखला जातो. पडद्यावर भलेही सनीपाजीचा रागीट स्वभाव दिसत असला तरी रिअल लाइफमध्ये तो खूपच शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. शिवाय तो कामाशी काम ठेवणारा कलाकार आहे. सुरुवातीपासूनच त्याला कोणासोबतही जास्त जवळीकता निर्माण करायला आवडत नाही. मात्र त्याच्या जीवनात एक घटना अशीही घडली होती जेव्हा तो शूटिंगदरम्यान त्याच्या सहकलाकारावर प्रचंड भडकला होता. हा सहकलाकार दुसरा-तिसरा कोणीही नसून अभिनेता अनिल कपूर हा होता.
    अनिल कपूर याने सनीपाजीबरोबर ‘राम-अवतार’ आणि ‘जोशिले’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९८९ मध्ये आलेल्या ‘जोशिले’ याच चित्रपटादरम्यानचा हा किस्सा घडला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान असे काही घडले ज्यामुळे सनीपाजी खूपच त्रस्त झाला होता. त्यावेळी सनी देओलच्या तुलनेत अनिल कपूरचे नाव मोठे होते. त्यामुळे बॉलिवूड नियमाप्रमाणे चित्रपट सुरू होण्याअगोदर मोठ्या आणि प्रसिद्ध अभिनेत्याचे नाव अगोदर दाखविले जाते. हीच बाब सनीपाजीला खटकली होती. जेव्हा चित्रपटाच्या के्रडिटमध्ये अनिल कपूरचे नाव सनी देओलच्या अगोदर टाकण्यात आले तेव्हा सनी देओलच्या रागाला पारावार उरला नव्हता. त्याने निर्मात्यांना चित्रपटाची शूटिंग करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.

    त्याचवर्षी सनी आणि अनिल कपूर यांचा ‘राम-अवतार’ हा चित्रपटदेखील येणार होता. मात्र मध्येच त्यांच्यातील नात्यात दरार निर्माण झाली होती. अशातही दिग्दर्शकांच्या आग्रहास्तव सनीने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला होता. शूटिंगदरम्यान दोघेही त्यांचा-त्यांचा शॉट देऊन मेकअप रूममध्ये निघून जायचे. स्टारडस्टच्या वृत्तानुसार, एका सीनदरम्यान सनी देओल आणि अनिल कपूरमध्ये चांगलीच हमरी-तुमरी झाली होती. हा वाद एवढा पेटला होता की, सनीपाजीनं चक्क अनिल कपूरचा गळा दाबला होता. त्याला श्वास घेणेही अवघड झाले होते. दिग्दर्शकांच्या बºयाचदा कट म्हणूनही सनीने अनिल कपूरला सोडले नव्हते. दोघांमधील हा सीन एवढा रिअल झाला होता की, संपूर्ण युनिटला धाव घ्यावी लागली. युनिटमधील सर्वांनी सनी देओलला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. परंतु सनीपाजी एवढ्या सहजा-सहजी कोणाला ऐकणे शक्य नव्हते. बराच वेळ हा प्रकार घडल्यानंतर सनीपाजीला बाजूला करण्यात आले. 

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *