गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 25 August 2017
पंढरपूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्रामध्ये एकमेव असलेले सुर्यनारायण देवता मंदिर असलेल्या पावनभुमीमध्ये मौजे नारायण चिंचोली ता.पंढरपूर येथे शौचालय या विषयावर आधारीत लघुपटाचे चित्रीकरण आज सुरु केले आहे. या गावातील तरुण रणजित राजु बुधनेर याची कथा असलेल्या या लघुपटाची पटकथा विकास गायकवाड यांनी तयार केली आहे. कलाटणी या लघुपटाची निर्मिती जनजागृतीसाठी करत असल्याची माहिती निर्माते रणजित बुधनेर यांनी दिली.
या लघुपटाचे दिग्दर्शन महादेव जाधवर हे करीत आहेत. हा लघु चित्रपट गावात शौचालयाबाबतीत जो सध्या सर्वांच्या समोर असलेला प्रश्न भेडसावत आहे. तो प्रश्न सोडविण्यासाठी जागृती व्हावी, सर्व गावे हागणदारीमुक्त व्हावीत, स्वच्छ व्हावीत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तयार होत असलेल्या या ल्ुपटावर व निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, कथा-पटकथाकार यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या लघुपटाचे चित्रीकरणाचे उद्घाटन प्रा.सुभाषराव बापुराव माने (सर), नानासाहेब माने यांचे हस्ते कॅमेरा पुजन करुन करण्यात आले. याप्रसंगी दिग्दर्शक महादेव जाधवर, निर्माता रणजित बुधनेर,विजय शहाणे (छायाचित्रण), गोवर्धन वाघमोडे, शिवाजी गुंड, दत्तात्रय मस्के, सचिन भडकवाड, रवि ठवरे, बापुराव कोले, विकास हाडमोडे, सौ.उषाताई कोले व इतर मान्यवर उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


