👁 9 Views

कर्ज माफीसाठी शेतक-यांनी मुदतीत अर्ज भरावेत- सहायक निबंधक -पी.टी.घुगे

  • गणेशोत्सवानिमित्त  सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 4 september  2017 
पंढरपूर दि.4:-  राज्य शासनाने राज्यातील शेतक-यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना जाहीर केली असून या योजनेतंर्गत कर्ज माफीसाठी  शेतक-यांनी विहित मुदतीत अर्ज भरावेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2017 पर्यंत आहे. शेतक-यांनी  आपले अर्ज ग्राहक सेवा केंद्र, महा-ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, , या ठिकाणी शासनाच्यावतीने नि:शुल्क अर्ज भरण्याची सोय केली असल्याची माहिती सहायक निबंधक(हकारी संस्था) पी.टी.घुगे यांनी दिली.

            पंढरपूर तालुक्यातील उपरी  येथील सार्वजनिक गणेश मंडळ येथे सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आयोजित संवादपर्व उपक्रमात ते बोलत होते. यावेळी  सरपंच हणमंत नागणे, संचालक विलास जगदाळे,  तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नवनाथ आसबे, माहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे, गणेश मंडळाचे अध्यक्ष अजय मोहिते, प्रविण नागणे, महेश नागणे, मर साबळे, हरिदास आसबे, विक्रांत जगदाळे, यांच्यासहशेतकरी, मान्यवर नागरीक व गणेशभक्त उपस्थित होते.

            यावेळी सहायक उपनिबंधक घुगे पुढे बोलताना म्हणाले, राज्य शासनाच्या निकषा नुसार दिड लाखांपर्यंत कर्ज माफी जाहिर केली आहे. यामध्ये 1 एप्रिल 2009 च्या नंतर घेतलेले पिक कर्ज व 30 जून 2016 पर्यंत थकीत असलेले कर्जदार या कर्ज माफीसाठी पात्र राहणार आहे. शेतक-यांना कर्ज माफीसाठी मदत करण्यास शासन सर्वोतोपरी मदत करीत आहे. तालुक्यात आतापर्यंत 15 हजार शेतक-यांनी कर्ज माफीचे ऑनलाईन अर्ज भरले असल्याचेही श्री घुगे यांनी सांगितले

            यावेळी कर्ज माफी बाबत  उपस्थित शेतक-यांनी अडीअडचणी विचारल्या त्यावर सहायक निंबधक यांनी सर्व शंकाना आणि प्रश्नांना उत्तरे देवून शेतक-यांचे समाधान केले. तसेच शेतक-यांनी या कर्ज माफी योजनेचे अर्ज विहित नमुन्यात तात्काळ भरावेत. या बाबत काही अडचणी आल्यास सहकार विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही सहायक निंबधक पी.टी.घुगे यांनी केले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *