👁 10 Views

शिक्षकांचा केलेला सत्कार हा प्रेरणादायी – आ. भालके

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 12  september  2017 
शिक्षकदिनानिमित्त गुरूप्रसाद कॉम्प्युटर्स तर्फे शिक्षकांचा सन्मान
। पंढरपूर, प्रतिनिधी
सध्याचे योग हे स्पर्धेचे असून यामध्ये ज्या त्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणे स्पर्धा आज आपणास दिसत आहे. शिक्षक हा भावी पिढी घडविणारा असून आज शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचे केलेले सत्कार हे प्रेरणादायी असल्याचे आ. भारत भालके यांनी सांगितले. ते गुरूप्रसाद कॉम्प्युटरच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै. पंढरी भूषणचे संपादक शिवाजी शिंदे हे होते. यावेळी नगरपालिकेचे नगरसेवक सचिन शिंदे, महिला पोलिस प्रियांका कडवळकर, सिंदुताई लवटे, श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक धोंडीराम वाघमारे, पत्रकार विलास मासाळ आदी उपस्थित होते.
पूढे बोलताना आ. भालके म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात शिक्षकांचे भरिव काम आहे. आज शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे बरिच बाह्यकामे कमी झाल्याने शिक्षकांना आपला बराच वेळ हा शिक्षणासाठी द्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांची एक चांगलीच फळी निर्माण होत आहे. त्यामुळे स्पर्धा परिक्षेमध्ये विद्यार्थी मोठे यश संपादन करीत आहे. याचे सर्व श्रेय या शिक्षकांचे आहेत. त्यामुळे आजचे सत्कार हे शिक्षकांना प्रेरणा देणार असल्याचे आ. भारत भालके यांनी सांगितले. 
यावेळी शिवाजी शिंदे, अमित भोरकडे, प्रशांत वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात महादेव रणदिवे, अमोल लवटे, आबासाहेब नवले, भारत इंगळे, किशोर बुधवंत, व्हि. जी. सुर्यगड, सुषमा कदम, संगिता मासाळ, ज्योती कलुबर्मेे, पुजा जाधव, वनिता बाबर, स्वाती नलवडे आदी सह 50 शिक्षक शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरूप्रसाद कॉम्प्युटरचे सर्जेराव पवार व स्वागत सुजाता पवार यांनी केले तर सुत्रसंचालन मृदुला देशमुख यांनी केले. आभार प्रदर्शन ज्योती कलुबर्मे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ बनसोडे, सोनाली गवळी, किरण नवले आदींनी परिश्रम घेतले. 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *