- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
स्वेरीत व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम संपन्न
पंढरपूर- ‘विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त आपल्या श्रवण प्रक्रियेला अधिक चालना द्यावी व मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत.आपल्या जीवनात यशस्वी वाटचाल करत असताना गुरुजनांचा आदर केल्यास, त्यांच्या मार्गदर्शनाचा अवलंब केल्यास आपल्या कौशल्य दर्जामध्ये वाढ होते व मिळणाऱ्या संस्कारातूनच एक उत्तम यशस्वी अभियंता होण्याची संधी मिळते.’ असे प्रतिपादन विराज एन्व्हरायजिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष राजेंद्र सराफ यांनी केले.
येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट,पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात वातानुकुलीत असलेल्या भव्य आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन विराज एन्व्हरायजिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष राजेंद्र सराफ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.दीपप्रज्वलनानंतर प्रास्तविकात प्रा. के. एम.क्षीरसागर यांनी व्यक्तिमत्व विकास हे विद्यार्थ्यांना का अत्यावश्यक आहे ? याबाबत सविस्तर सांगितले. यावेळी सौ. सराफ, उपप्राचार्य डॉ. एस. एन. कुलकर्णी, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी, प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. सतीश लेंडवे, आदी प्राध्यापक वर्ग व प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षातील जवळपास १००० विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एस. बी. साळुंखे यांनी केले तर आभार प्रा.उत्तम अनुसे यांनी मानले.
छायाचित्र- स्वेरीमध्ये प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे विराज एन्व्हरायजिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष राजेंद्र सराफ, सोबत डावीकडून सौ. सराफ, उपप्राचार्य डॉ. एस. एन. कुलकर्णी, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी, प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. सतीश लेंडवे आदी प्राध्यापक वर्ग आदी
From-
Shri. Santosh C. Halkude
Pandharpur – 413 304.
Mob: 9545 55 36 28,
Pandharpur – 413 304.
Mob: 9545 55 36 28,
9850 24 21 55
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे




