- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 13 september 2017
मुंबई, दि. 13 : मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना आपले विचार, आपले अनुभव मांडण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने “आपलं मंत्रालय” मासिकाच्या माध्यमातून केले आहे, असे गौरवोद्गार मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काढले.
“आपलं मंत्रालय” मासिकाच्या दुसऱ्या अंकाचे (सप्टेंबर) प्रकाशन आज श्री.तावडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव ब्रिजेश सिंह, लोकराज्य मासिकाचे संपादक सुरेश वांदिले यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
श्री. तावडे यावेळी म्हणाले, मंत्रालयात अनेक अधिकारी आणि कर्मचारी काम करीत असतात. वेगवेगळया अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कामानिमित्त ओळख होत असते. पण ‘आपलं मंत्रालय’ या मासिकामुळे एकाच वेळी अनेकांना मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्याची ओळख होण्यास मदत होणार आहे. ‘आपलं मंत्रालय’ हे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हक्काचे व्यासपीठ आहे. या व्यासपीठामुळे मंत्रालयातील अनेकांना व्यक्त होण्याची संधी मिळाली आहे, असे श्री. तावडे यांनी सांगितले.
शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये लेखनाची प्रतिभा आहे आणि म्हणूनच मंत्रालयात एका दिवसाचे साहित्य संमेलन आयोजित केले जावे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आपलं मंत्रालय मासिकाने मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी साहित्य संमेलन आयोजित करावे. तसेच या साहित्य संमेलनास मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य विभाग पाठिंबा देईल, असे श्री. तावडे यांनी सांगितले.

सप्टेंबर अंकाची वैशिष्ट्ये
29 ऑगस्ट 2017 रोजी मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मंत्रालयात मुक्कामी राहिलेल्यासाठी मंत्रालयातील उपहारगृहाच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास 800 लोकांसाठी नाश्ता आणि 2000 लोकांसाठी रात्रीच्या जेवणाची सोय केली. उपहारगृहातील सर्वांनीच एकत्र येत अडचणीच्या काळात कसे आदरातिथ्य केले याविषयीचा लेख या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे. शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी स्वत:चे दालन कसे कलात्मक पध्दतीने सजवले आहे याविषयीचा विशेष लेख यामध्ये आहे. हिमालय गिर्यारोहण करीत असतानाचे आलेले अनुभव ‘आम्ही जिंकलो’ या लेखातून वाचायला मिळतात. माणसाला असलेल्या अक्कल दाढेचे महत्व, सामाजिक माध्यमाद्वारे राबविलेला मोहीम कशी यशस्वी होऊ शकते याबाबतचा लेख, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जेठालाल अमृतलाल शाह यांचा नवी दिल्लीत झालेला सत्कार, सुसंवादाची सृजनयात्रा, महाराष्ट्र वार्षिकी 2017 काय आहे, लोकलमधून प्रवास करीत असताना येणारे अनुभव, शासकीय कामकाज अधिक चांगले कशा पध्दतीने करता येऊ शकते यावरील लेख,कथा-कवितांसह “आपलं मंत्रालय” चा दुसरा अंक आपल्या सर्वांच्या भेटीला आला आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी यावेळी हे मासिक सुरु करण्यामागची भूमिका विशद केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेंडकरांवर प्रकाशित झालेल्या लोकराज्य मासिकाच्या विशेषांकातील काही लेख संग्रहित करून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेल्या “महामानव” पुस्तक, ‘महाकर्जमाफी’ पुस्तिका, मराठी, हिंदी, उर्दू आणि गुजराती लोकराज्य मासिकाचे सप्टेंबर २०१७ चे अंक, श्री. सिंह यांनी श्री. तावडे यांना भेट दिले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

