- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 16 september 2017
मुंबई, दि. 16 : राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
संपूर्ण देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला असला तरीही मराठवाडयासह जुन्या हैदराबाद संस्थानातील लोकांना स्वातंत्र्यासाठी१७ सप्टेंबर १९४८ या दिवसाची वाट पहावी लागली होती. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस जुन्या हैद्राबाद संस्थानाचा भाग असलेल्या व आता महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा राज्यात समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील लोकांकरीता महत्वाचा दिवस आहे. मराठवाडा मुक्ती लढ्यात अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी या ऐतिहासिक लढयातील सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहतो तसेच जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो, असे विद्यासागर राव यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे



