दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी ग्रीनटिन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या पंढरीतील एकमेव आयटी कंपनीला 5 व्या सीआयआय नॅशनल डिजिटेक सर्कल कॉम्पिटिशन 2024 मध्ये सेवा क्षेत्र आणि उत्पादनासाठी डिजिटल तंत्रज्ञानातील सर्वोत्तम स्टार्टअपसाठी प्रतिष्ठित असा सुवर्ण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
हा प्रतिष्ठित सन्मान या कंपनीतील प्रत्येक टीम सदस्याने आपल्या कामात दाखवलेली आवड, सर्जनशीलता आणि वचनबद्धतेला अधोरेखित करते. हा पुरस्कार ग्रीनटिन सोल्यूशन्सच्या नाविन्यपूर्ण कल्पना, कौशल्य आणि उत्कृष्टतेसाठीच्या सततच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे.
“हा पुरस्कार मिळाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला असुन आमच्या कंपनीतील प्रत्येक सदस्याच्या उत्कृष्ट कामगिरी चा आम्हाला सार्थ अभिमान आहे,” असे ग्रीनटिन सोल्यूशन्सचे सीईओ राजसिंह डुबल यांनी सांगितले. “हे यश आमच्या संपूर्ण टीमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे प्रतीक आहे. एकत्रितपणे, आम्ही उत्कृष्टतेचा एक नवीन मानक स्थापित केला आहे आणि आम्ही जे साध्य केले त्याचा मला अभिमान आहे.”असंही श्री. डुबल म्हणाले.
या उल्लेखनीय यशाचा उत्सव साजरा करताना, ग्रीन टीन सोल्यूशन कंपनीने डिजिटल तंत्रज्ञानात नाविन्य आणि उत्कृष्टतेच्या सीमांना पुढे नेण्यासाठी ची प्रेरणा घेतली असुन भविष्यात आणखी मोठमोठी ध्येय्य ठेवून अपेक्षित लक्ष साध्य करण्याची अपेक्षा आहे. हे लक्ष साधण्यासाठी ग्रीनटिन सोल्यूशन्सच्या प्रत्येक सदस्याचे अभिनंदन. आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!
१७ ऑगस्ट २०२४ रोजी ग्रीनटिन सोल्यूशन्सच्या कार्यालयात विविध पदांसाठी ड्राईव्ह चं आयोजन
ग्रीनटिन सोल्यूशन्स सध्या विस्ताराच्या दिशेने वाटचाल करत असल्याने पंढरपूर आणि आजुबाजुच्या परिसरातील सर्व अभियंता तरुणांना माहिती देण्यात येते की, १७ ऑगस्ट २०२४ रोजी ग्रीनटिन सोल्यूशन्सच्या कार्यालयात फ्रंट एंड डेव्हलपर, बॅक एंड डेव्हलपर, सॉफ्टवेअर टेस्टर आणि सेल्स आणि मार्केटिंग या पदांसाठी ड्राईव्ह आयोजित केल आहे. . इच्छुक उमेदवारांनी rajat@greentinsolutions.com या ईमेल आयडीवर आपला बायोडाटा पाठवावा आणि त्या दिवशी उपस्थित राहून संधीचा फायदा घ्यावा.
पंढरपुरकरांसाठी अभिमानास्पद “ग्रीन टीन सोल्यूशन आयटी कंपनी”
पंढरपूर नगरी ही अध्यात्मिक नगरी म्हणून सर्वपरिचित आहेच, परंतु आता पंढरी हे साधुसंतांचे माहेर यासोबतच शिक्षणाचे माहेर म्हणुनही ओळखले जात आहे. प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षण देणाऱ्या विविध शैक्षणिक संस्था पंढरीत आहेत. पंढरपुरात एखादी आयटी कंपनी असावी हे स्वप्नंही आता साकार झालेय. ग्रीन टीन सोल्यूशन चे सीईओ राजसिंह डुबल यांच्या अथक परिश्रम आणि निष्ठापूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे. पंढरपुर पुणे रोडवर इसबावी परिसरातील कंडरे रेसिडेन्सी येथे श्री.डुबल यांनी ही कंपनी सुरू केली आणि अवघ्या कांही वर्षातच या आयटी कंपनीने डिजीटल तंत्रज्ञानात चमकदार कामगिरी बजावली आहे. आयटी हब नसलेल्या पंढरपूरसारख्या छोट्याशा ठिकाणी हा उपक्रम सुरू केल्याबद्दल आणि पंढरपूर आणि परिसरातील तरुण अभियंते आणि तरुणांना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी राज डुबल सर यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
ग्रीनटिन सोल्यूशन्स सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. आणि या कंपनीच्या अंतर्गत श्री. राज डुबल यांनी संपूर्ण पंढरपूर आणि आजुबाजुच्या परिसरातील युवा अभियंत्यांना खरंच एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.
नुकतेच या कंपनीला पाचव्या सीआयआय नॅशनल डिजिटेक सर्कल कॉम्पीटेशन २०२४ मधील ही कंपनी सुवर्णपदक विजेती ठरली असुन ही बाब निश्चितच तमाम पंढरपुरकरांसाठी अभिमानास्पद आहे. हा पुरस्कार मिळवण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. परंतु त्या सर्व कंपन्यांना मागे टाकून श्री. राज डुबल सर यांच्या ग्रीनटिन सोल्यूशन्स या कंपनीने बाजी मारली आणि हा सुवर्ण पुरस्कार प्राप्त केला. या कंपनीचे सीईओ राजसिंह डुबल सर आणि संपूर्ण टीमला पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹 -भगवान वानखेडे (संपादक, पंढरपूर लाईव्ह)
ग्रीनटिन कुटुंब आणि सर्व टीम्सना या पुरस्कारासाठी हार्दिक अभिनंदन! हे सर्वांच्या कठोर परिश्रम आणि संघकार्यामुळे शक्य झाले आहे. तुमच्या सर्व प्रयत्नांसाठी धन्यवाद. आम्ही अनेक अडचणींचा सामना केला आणि एकत्र येऊन त्या मात केल्या आणि या यशाचा आनंद घेतला. मला विश्वास आहे की भविष्यात अधिक मोठे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करून आपण मोठे यश प्राप्त करू शकतो. अभिनंदन आणि एक उत्कृष्ट टीम बनवण्यासाठी धन्यवाद, असे मत कंपनीचे टीम लीड श्री महेश वाकडे सर यांनी व्यक्त केले.
सदरिल पुरस्कार हा कोणाच्या एकट्याच्या प्रयत्नामुळे नसून, संपूर्ण टीमच्या सदस्यांनी केलेल्या कठोर परिश्रमाच प्रतीक आहे. विशेषतः त्यात सेल्स टीमचे महत्त्वाचे योगदान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्लायंट वाढवण्याच्या आमच्या प्रयत्नांना आता यश येत आहे. ग्रीनटिन सोल्यूशन्स सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. आणि या कंपनीच्या अंतर्गत श्री. राज डुबल यांनी संपूर्ण पंढरपूर आणि आजुबाजुच्या परिसरातील युवा अभियंत्यांना खरंच एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. आणि त्याबद्दल मी श्री. राज डुबल आणि संपूर्ण ग्रीनटिन टीमचे मनःपूर्वक आभार मानू इच्छितो असे मत कंपनीच्या टीम लीडर श्री अनंत खोले सर यांनी व्यक्त केले.
नुकतेच कंपनी पाचव्या सीआयआय नॅशनल डिजिटेक सर्कल कॉम्पीटेशन २०२४ साठी सुवर्णपदक विजेती ठरली असुन ही बाब निश्चितच तमाम पंढरपुरकरांसाठी अभिमानास्पद आहे. हा पुरस्कार मिळवण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. परंतु त्या सर्व कंपन्यांना मागे टाकून आमच्या ग्रीनटिन सोल्यूशन्स या कंपनीने बाजी मारली आणि हा सुवर्ण पुरस्कार प्राप्त केला. या कंपनीचे सीईओ राजसिंह डुबल सर आणि संपूर्ण टीमला पुढील यशस्वी वाटचालीसाठी कंपनीचे AVP – Sales श्री निशांत सर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या…
Greentin Solutions Pvt Ltd Wins Gold Award for Best StartUp in Digital Technology at 5th CII National DigiTech Circle Competition 2024
Pandharpur, 01/08/2024
– Greentin Solutions Pvt Ltd is proud to announce that we have been honored with the prestigious Gold Award for Best StartUp in Digital Technology for the Service Sector & Manufacturing at the 5th CII National DigiTech Circle Competition 2024.
This esteemed recognition highlights the passion, creativity, and commitment that each team member brings to our work every day. It is a testament to the innovative spirit and relentless pursuit of excellence that defines Greentin Solutions.
“We are thrilled and humbled to receive this award,” said Rajsinh Dubal, CEO at Greentin Solutions. “This achievement is a reflection of the hard work and dedication of our entire team. Together, we have set a new standard of excellence, and I couldn’t be prouder of what we’ve accomplished.”
As we celebrate this remarkable success, we are inspired to continue pushing the boundaries of innovation and excellence in digital technology. We look forward to achieving even greater milestones in the future.
Congratulations to every member of the Greentin Solutions team for making this possible. Here’s to many more achievements ahead!