Madha : उंदरगाव येथे पहिल्यांदाच उत्साहात संपन्न झाला ‘खेळ पैठणीचा’ ; अभिजीत पाटलांच्या पुढाकाराने माढा तालुक्यातील उंदरगाव येथे नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न

Loading

 


प्रतिनिधी पंढरपूर/- 

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी माढा तालुक्यात माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आपला जनसंपर्क वाढवण्यामध्ये जंगजंग बांधला असून अभिजीत पाटील हे गावोगावी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेत अभिजीत पाटील आपला संपर्क वाढवत असताना दिसत आहेत. 


विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त अभिजीत आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उंदरगाव येथील अभिजीत पाटील यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन केले असता सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजु यांच्या उत्कृष्ट संयोजनातून दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलाविण्याचा हेतू सफल झाला. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनाही आनंदाचे क्षण वेचता यावे या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता.

यावेळी भाऊसाहेब महाडिक-देशमुख, ऋषिकेश काका तांबिले,  उपसरपंच समाधान मस्के, संजय बापू तांबिले, आबासाहेब साठे, नंदकिशोर आरे, मगन नाईकवारे, सुधीर लवटे, सुरज कांबळे, वाय.जी. भोसले, ग्रामपंचायत सदस्य केवड अमोल धर्मे यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

माढा मतदारसंघ कायम राजकारण्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चेत ठरलेला दिसून येतो मात्र विकासाच्या बाबतीत माढा तालुक्यामध्ये अधोगती दिसून आलेली आहे. येथील महिला, तरुण तसेच हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम व त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण कायम काम करणार आहे. आज खेळ पैठणीच्या कार्यक्रमातून हजारो माय-माऊलींच्या चेहऱ्यावरचा आनंद मनाला समाधान देणारा होते. येथील  माता-भगिनींनी उस्फूर्त प्रतिसाद देत खेळांमध्ये सहभाग नोंदविल्याबद्दल आभार व्यक्त केले.

– अभिजीत पाटील,

चेअरमन- श्री विठ्ठलसह.साखर कारखाना

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *