👁 3 Views

कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये लायन्स क्लबची ‘पीस पोस्टर’ व चित्रकला स्पर्धा उत्साहात; संस्कार काळे याच्या चित्राची प्रांत स्तरावर निवड

कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये लायन्स क्लबची ‘पीस पोस्टर’ व चित्रकला स्पर्धा उत्साहात; संस्कार काळे याच्या चित्राची प्रांत स्तरावर निवड

पंढरपूर (प्रतिनिधी) : श्री पांडुरंग प्रतिष्ठानच्या कर्मयोगी विद्यानिकेतन येथे लायन्स क्लब ऑफ पंढरपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व ‘पीस पोस्टर स्पर्धा २०२६-२७’ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. ‘मानवतेतील सलोखा’ या विषयावर आधारित पीस पोस्टर स्पर्धेत संस्कार सोमनाथ काळे याने प्रथम क्रमांक पटकावला असून, त्याचे चित्र लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीने पुढील स्पर्धेसाठी प्रांत स्तरावर पाठवण्यात आले आहे.
​या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डिस्ट्रिक्ट चेअरमन (पीस पोस्टर स्पर्धा) लायन सुहास निकम यांच्या हस्ते प्रथम विजेता संस्कार काळे याला बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना निकम म्हणाले की, “या स्पर्धेसाठी पंढरपूरमधील सर्व क्लबमधून ४५१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.”
​उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त विद्यार्थी :
यावेळी विद्यानिकेतनच्या खालील विद्यार्थ्यांच्या चित्रांचे कौतुक करून त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले:
​एकलव्य अशोक भांगे
​साईश संतोष उखंडे
​हिमांशू विक्रम गायकवाड
​अनिका विनायक खोले
​शौर्य अमरदीप गाजरे
​समृद्धी तुकाराम फुलारे
​संध्या महादेव भोसले
​श्रावणी विशाल घाडगे
​आकांक्षा संजय गायकवाड
​या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कर्मयोगी विद्यानिकेतनच्या प्राचार्या सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत उपयुक्त ठरतात, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन रोहन परिचारक यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
​या कार्यक्रमाला लायन्स क्लब पंढरपूरचे डिस्ट्रिक्ट चेअरमन सुहास निकम, अध्यक्ष अतुल कौलवार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे रजिस्ट्रार गणेश वाळके, विद्यानिकेतनच्या चित्रकलेच्या शिक्षिका वृषाली काळे, चेतना पवार, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *