पंंढरपूर तालुक्याच्या चिलाईवाडीतील शेळके वस्ती आणि शिंदे वस्तीच्या विकासाला नवी दिशा! ;
निवडणुकीत पराभव झाला, पण जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला! – रामभाऊ गायकवाड
पंंढरपूर (प्रतिनिधी): मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या पंंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी येथे शेळके वस्ती व शिंदे वस्ती येथील भगीरथ ट्रान्सफॉर्मरच्या कामाचे भूमिपूजन रामभाऊ गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. या कामासाठी सुमारे ५८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गावातील बहुतांश नागरिकांना भगीरथ योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार असून, वीजपुरवठा सुरळीत होऊन २४ तास वीज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
यावेळी बोलताना रामभाऊ गायकवाड म्हणाले की, “पंचायत समितीची निवडणूक लढवत असताना मी शेळके वस्ती आणि शिंदे वस्ती येथील नागरिकांना विकासकामाचे आश्वासन दिले होते. निवडणुकीत पराभव झाला, तरी मी जनतेला दिलेला शब्द विसरलो नाही. त्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि आज या कामाचे भूमिपूजन होत असल्याचे मनापासून समाधान आहे. माझ्यासाठी निवडणुकीतील विजय किंवा पराभव यापेक्षा जनतेला दिलेला शब्द आणि जनतेचा विश्वास महत्त्वाचा आहे. पद असो वा नसो, गावाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी माझे प्रयत्न कायम सुरू राहतील. आज ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हीच माझ्या प्रयत्नांची खरी पावती आहे.”
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सरपंच नागनाथ भाऊ जमदाडे यांनी भूषविले होते. यावेळी प्राध्यापक जेधे सर, माझे उपसरपंच पिटू पवार, शिक्षक जमदाडे गुरुजी, शंकर मोहिते, सतीश शिंदे, नागनाथ जमदाडे, परमेश्वर शेळके, कपिल जमदाडे, उत्तम जमदाडे, लक्ष्मण शेळके, सागर जमदाडे, राजाभाऊ देशमुख, स्वप्निल शेळके, केशव शेळके, हरीभाऊ देशमुख, विनोद थोरात, समाधान मोहिते, सचिन शिंदे, सतीश दादा माळी, पैलवान विजय आरकेले, सोमनाथ पवार, चिलवाडीचे पोलीस पाटील सागर जमदाडे यांच्यासह गावातील सर्व मान्यवर, सहकारी मित्र आणि लहान-थोर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……………………
मा. संपादक, पत्रकार महोदय
कृपया आपल्या लोकप्रिय माध्यमातून वरील वृत्तास प्रसिध्दी देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती.
आपला – रामभाऊ गायकवाड (राज्य समन्वयक: मराठा क्रांती मोर्चा)

