👁 107 Views

हिंगोलीचे कवी -गणेश आघाव यांची कविता ” बंगालच्या पाठ्यपुस्तकात “

हिंगोलीचे कवी -गणेश आघाव यांची कविता ” बंगालच्या पाठ्यपुस्तकात “

हिंगोली जिल्ह्यातील सावळी खूर्द येथील कवी -गणेश आघाव यांच्या ” ही तर रानाची पोर ” या मराठी कवितेचा ” बंगाली ” भाषेतील अनुवाद बंगालच्या इ. 6 वी च्या पाठ्यपुस्तकात घेण्यात आला आहे.


या अगोदर कवी गणेश आघाव यांची ” निसर्ग फुलला ” ही कविता ” गुजराती ” पाठ्यपुस्तकाच्या इ. 7 वी. च्या अभ्यासक्रमात गुजरातमध्ये शिकवली जाते आहे.
मातीच्या कविता,निसर्ग आपुला खुलतो रे, बारभाई, वर्तमानातल्या कविता..इ. काव्य संग्रह प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या ” पोरी शाळेत निघाल्या ” या मराठी कवितेचा आजपर्यंत तब्बल 21 आंतरराष्ट्रीय भाषांमधे व भारतातील जवळपास सर्व बोली भाषांमधे अनुवाद केला गेला आहे.


सध्या जपान, आसाम, गुजरात व आता बंगालच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला आहे..

या निमित्ताने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जाते आहे…

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *