👁 261,998 Views

Pandharpur : कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

Pandharpur : कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग पंढरपूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. महाविद्यालयाचा यावर्षीचा निकाल ९२ टक्के लागला आहे.
यामध्ये प्रथम क्रमांक आश्लेषा प्रवीण कावरे (८३.६६ %), व्दितीय क्रमांक दीपाली नवनाथ पवार (८०.३३ %) तर तृतीय क्रमांक मोनाली नागनाथ पवार (७९.६६ %) व सानिका बालाजी कदम (७९.६६ %) यांनी मिळवला आहे.
महाविद्यालयाचे शिस्तबद्ध वातावरण, नियमित शिक्षणप्रणाली व अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या विशेष मार्गदर्शनामुळे हे घवघवीत यश मिळाले आहे असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. तसेच आपल्या पाल्यांचे या महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचे सार्थक झाले अशी भावना यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केली. बी.एस्सी नर्सिंग महाविद्यालयाचे हे दुसरेच वर्ष असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केली आहे
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे प्रा. गुरुराज कुलकर्णी, कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील ,पॉलीटेकनिकचे प्राचार्य डॉ. ए. बी. कणसे, कर्मयोगी फार्मसी चे प्राचार्य एस. एम. जाधव,कर्मयोगी विद्यानिकेतन सायन्स ज्यु. कॉलेज च्या प्राचार्या सौ. एम. आर. पाटील, रजिस्ट्रार गणेश वाळके, वर्गशिक्षक प्रा. सोमेश निकम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *