पंढरपूर (प्रतिनिधी): स्वर्गीय आप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान,पंढरपूर आयोजित स्वर्गीय आप्पासाहेब चव्हाण सर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त स्मृती पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा गणेश नाथ महाराज मंगल कार्यालय, के बी पी कॉलेज चौक पंढरपूर येथे रविवार दिनांक ४ मे २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक, वामनराव माने सर, सुभाषराव माने सर तसेच हरीषदादा गायकवाड, पंडितराव अशा लोकप्रिय मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यामध्ये अजनसोंड, चिंचोली, शेटफळ बोहाळी, पंढरपूर येथील शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
पंढरपूर येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर मधील कु. स्नेहा लहू शिंदे या विद्यार्थिनीचा गुणवंत विद्यार्थिनी म्हणून सत्कार करण्यात आला.पंढरपूर येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर मधील कु. स्नेहा लहू शिंदे या विद्यार्थिनीचा गुणवंत विद्यार्थिनी म्हणून सत्कार करण्यात आला.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना कर्मयोगी विद्यानिकेतन या संस्थेचे ट्रस्टी रोहन परिचारक, संस्थेचे रजिस्ट्रार गणेश वाळके सर आणि संस्थेच्या प्राचार्या सौ. प्रियदर्शनी सरदेसाई मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.