मोहोळ: व्यायामाच्या दोरीचा गळफास बसुन दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

मोहोळ: व्यायामाच्या दोरीचा गळफास बसुन दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Loading

मोहोळ: आईच्या व्यायामासाठी तयार केलेल्या दोरीचा गळफास बसून एका शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अंकोली, ता. मोहोळ येथे गुरुवार ता 20 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

हर्षवर्धन विनायक इंगळे (वय-15) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

तो इयत्ता दहावीत शिकत होता. परीक्षेच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची अकस्मात मयत अशी मोहोळ पोलिसात नोंद झाली आहे.

मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, मृत हर्षवर्धनच्या आईला अर्धांगवायूचा आजार झाला आहे. डॉक्टरांनी त्यांना व्यायामाचा सल्ला दिला होता. व्यायामाने आईला लवकर बरे वाटावे म्हणून घराच्या पत्र्याच्या अँगलला एक दोरी बांधून तिला लोखंडी सळईचा त्रिकोणी अँगल बनविला होता व त्याला मूठ लावलेली होती. त्याद्वारे आईचा व्यायाम सुरू होता.

दरम्यान आईकडे जाताना घरात अंधार होता त्यामुळे हर्षवर्धनला ती लोंबकळत असलेली दोरी दिसली नाही. त्यामुळे तो तसाच पुढे गेला असता सदर दोरीचा हर्षवर्धनच्या गळ्याला फास लागला. व तो गतप्राण झाला.

हर्षवर्धन हा मोहोळ येथील नेताजी प्रशालेचा सर्वात हुशार विद्यार्थी होता. तो अभ्यासात खूप हुशार होता. त्याला कायम कुठल्याही परिक्षेत 95 ते 96 टक्के गुण मिळायचे. वडील मिस्त्री काम करतात. इयत्ता पाचवीत असताना सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळविलेला तो परिसरातील एकमेव विद्यार्थी होता.

या घटनेची खबर पोलीस हवालदार सोनकवडे यांनी दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन एन आतकरे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *