मोटरसायकल आडवून तरूणाच्या पोटावर तलवारीने सपासप वार…..

मोटरसायकल आडवून तरूणाच्या पोटावर तलवारीने सपासप वार…..

Loading

बीड: धारूर येथील गणेश नडगिरे हे (ता. १९) फेब्रुवारी रोजी संध्याकाळी धारूर – तेलगाव रोडवरील श्रावणी पॅलेसच्या जवळ रस्त्याने मोटरसायकलवर जात असताना अचानक तीन जणांनी येऊन तलवारीने वार करून जखमी केले.

त्यांना उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्यात पोलिसांना यश आले.

नव तरुणांना भांडणाची भीती राहिली नाही. लहान-मोठ्या कारणावरून जीवावर उठण्याच्या घटना बीड जिल्ह्यात रोजच पाहायला मिळत आहेत. धारूर येथील गणेश नडगिरे हे ता. १९ रोजी रात्री एक ते दोन च्या दरम्यान शहरातील धारूर-तेलगाव रस्त्यावरून मोटरसायकल वर जात असताना श्रावणी पॅलेसजवळ असताना अचानक धारूर तालुक्यातील गोपाळपूर ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर येथील अशपाक खान मोहम्मद शेख ऊर्फ गुड्डू, उस्मान खान मोहम्मद शेख, बबलू खान मोहम्मद त्यातील दोन जणांनी तलवारीने हाताच्या पंजावर वार केले.

तर, तिसऱ्या व्यक्तीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीव मारण्याची धमकी दिली. जखमीला धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काल ता. २१ रोजी धारूर येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी जखमीचा जबाब नोंदवून अशपाक खान मोहम्मद शेख, उस्मान खान मोहम्मद शेख, बबलू खान मोहम्मद या तीन जणांवर विविध कलमाखाली धारूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्या नोंद करण्यात आला आहे.

धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, उपनिरीक्षक बाबासाहेब भवरसह पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ आरोपीचा शोध घेऊन तिन्ही आरोपींना अटक करून धारूर येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आहे. अशी घटना पहिल्यांदाच घडल्याने धारूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भांडण कोणत्या कारणाने झाले हे निश्चित समजले नाही.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *