वैराग येथे पंधरा दिवसांपूर्वी ट्रॅक्टर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात जखमी झालेल्या ऋतुजाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. तिचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तिच्या मृत्यूमुळे वैराग शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
वैराग (ता. बार्शी) येथे अतुल मोहिते हे ३१ जानेवारी रोजी पुतणी ऋतुजा अजित मोहिते ( वय १९) हिला घेऊन मोटारसायकलवरून घराकडे निघाले होते. त्यावेळी हिंगणी रोडवर उसाच्या मळीने भरलेला ट्रक्टर व मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. त्यामध्ये ऋतुजा हिच्या उजव्या पायाच्या मांडीला गंभीर जखम झाली, तिचा डावा कान तुटला व डोक्याला गंभीर मार लागला होता.
ती सध्या वैद्यकीय शिक्षण घेत होती तसेच चुलते अतुल मोहिते देखील जखमी झाले. ऋतुजाला सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र १५ दिवसांपासून तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली व तिचा शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. सदर अपघातातील ट्रॅक्टर चालकावर वैराग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.