- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 21 september 2017
श्री सिध्दसिहासन पिठ श्री गुंडा महाराज संस्थान पंढरपूर यांच्या वतीने श्रीमदआद्य सदगुरु गुंडा महाराज सिध्दरस उदगीरकर यांचा द्विशताब्दीपुण्यतिथी महोत्सव गांधी रोड पंढरपूर येथील गुंडा महाराज मठामध्ये भक्तीपुर्ण वातावरणात साजरा होत आहे.दिनांक 21 सप्टेंबर 2017 ते 27 सप्टेंबर 2017 या कालावधीत मठात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मठामध्ये नित्यगुंडानारायण महाराज सिध्दरस हे चक्क्री भजन करणार आहेत.तसेच दररोज संगीत भजनी मंडळ,किर्तन,शास्त्रिय गायन,गाथा पारायण याचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता ह.भ.प.गुंडा नारायण महाराज लिखीत श्री गुंडासिध्द चरित्रगाथेचा प्रकाशन चिदंबरेश्वर किसन महाराज साखरे(आळंदी)यांचे शुभहस्ते होणार आहे.तसेच एकादशी चक्रीभजन रजतपटाचे अनावरण ह.भ.प.वा.ना.उत्पात यांचे हस्ते होणार आहे.
या सोहळ्याच्या सांगता समारंभादिवशी चक्र्ीसुक्त स्वाहाकार अपुर्व यज्ञ करून काल्याचे किर्तनाने होणार आहे.तरी भाविक भक्तांनी श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुंडा महाराज सिध्दरस मठाचे पिठाधीपती ह.भ.प.गुंडा नारायण महाराज सिध्दरस यांनी केले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


