- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 22 september 2017
पंढरपूर: पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय व यशवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरामध्ये भव्य कर्मवीर प्रतिमा मिरवणूक मोठ्या उत्सवात शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी संपन्न झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव यांच्या हस्ते कर्मवीर प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जनरल बॉडी सदस्य डॉ. राजेंद्र जाधव, यशवंत विद्यालय मुख्यध्यापक श्री. निकम, उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी, उपप्राचार्य प्रा. जे. एस. पाटील, उपप्राचार्य एन. एन. तंटक, सांकृतिक विभाग प्रमुख डॉ. विकास कदम, समारंभ समिती प्रमुख डॉ. एच. एम. लोंढे, रजिस्टार श्री व्ही. बी. होवाळ, नगरसेवक मा. बाळासाहेब नेहतराव शिक्षक-शिक्षेतर सेवक उपस्थित होते.
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, रयत शिक्षण संस्थेचा विजय असो..! ज्ञानाचा दिवा घरो घरी लावा, कर्मवीर भाऊराव पाटील अमर रहे!, कर्मवीर अण्णाचा विजय असो. अशा अनेक घोषणांनी पंढरपूर नागरी दुमदुमली. श्री. अशोक चव्हाण यांचा बैलजोडीने मिरवणुकीची शोभा वाढवली. डॉ. अमर कांबळे, डॉ. डी. जी. सोनटक्के, प्रा. आर. एस. पवार, प्रा. के. पी. गायकवाड, सौ. ए. पी. रोंगे, ए. एम. मोरे मॅडम यांनी निवेदनातून अण्णांच्या जीवनकार्य कर्तुत्वाचा परिचय करून दिला.
मिरवणूक सकाळी ८.१५ वाजता महाविद्यालयातून सुरु होऊन सरगम चौक, इंदिरा गांधी चौक, भोसले चौक, अर्बन बँक, भादुले चौक, नाथ चौक, चौफाळा, शिवाजी पुतळा, सावरकर पुतळा, ग्रामीण तालुका पोलीस स्टेशन, मार्केट कमिटी मार्गे महाविद्यालयात आली. या आनंद सोहळ्यात पंढरपूर शहर, पंढरपूर परिसरातील रयत प्रेमी मान्यवरांनी सहभागी होऊन अण्णाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कर्मवीर अण्णांना अभिवादन केले. डॉ. समाधान शिंदे आणि त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील ५० विद्यार्थी आणि ३० विद्यार्थिनी अनेक चौकात झांजपथकाच्या विविध कला सदर केल्या. या शोभा यात्रेत राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, महाविद्यालय व यशवंत विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक-शिक्षेतर सेवक सहभाग होते. विद्यार्थी व सेवकांना अल्पोहार देऊन महाविद्यालयात मिरवणुकीचे विसर्जन करण्यात
आले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


