👁 11 Views

पालकमंत्र्यांकडून‘नवी आनंद वार्ता’ गुरूवारी पंढरपूर एमआयडीसीसाठी मुंबईत बैठक

पंढरपूर लाईव्ह व सा. झंझावात च्या सर्व वाचक, हितचिंतक, जाहिरातदार बंधु-भगिणींना दसरा सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! 
सर्व बौध्द बंधु भगिणींना धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 30 september  2017 

पंढरपूर (प्रतिनिधी) : मागील अनेक वर्षांपासून पंढरपूरकरांचा एमआयडीसी या जिव्हाळ्याच्या विषयाला पालकमंत्र्यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर हात घातला असून गुरूवार दि. 5 ऑक्टोबर रोजी याबाबत मुंबईतील मंत्रालयात बैठक आयोजित केली असल्याची नवी आनंद वार्ता श्री विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनानंतर दस्तुरखुद्द पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली.
आज विजयादशमीच्या मुहूर्तावर नवरात्रीच्या सांगतेला पंढरपुरातील एका खाजगी कार्यक्रमासाठी पालकमंत्री आले होते. त्यानंतर त्यांनी श्री विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेतले. या दर्शनानंतर पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना पंढरपूर शहरात एमआयडीसी करण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.
हे निवेदन स्विकारल्यानंतर पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यात नव्याने एमआयडीसी उभारण्याबाबत गुरूवार दि. 5 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.  या बैठकीला आपण उपस्थित रहावे, असे आवाहन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी उपस्थित पदाधिकार्‍यांना केले. 
यावेळी भाजपाचे सरचिटणीस संजय वाईकर, जिल्हा चिटणीस दत्तात्रय राजपूत, पंढरपूर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष नितीन करंडे, शहर चिटणीस आनंद कुलकर्णी, किसान आघाडीचे जिल्हा चिटणीस महादेव खिलारे, राजाभाऊ पवार, सांगोल्याचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, गिरीष आराध्ये, प्रा. चांगदेव कांबळे आदी उपस्थित होते.
गुरूवारी मुंबई येथे होणार्‍या एमआयडीसी या विषयाच्या बैठकीसाठी पालकमंत्र्यांनी पंढरपूर शहरातील भाजप पदाधिकार्‍यांना आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन केले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *