- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
संशयीत आरोपींना ताब्यात घेतले असून लवकरच गुन्ह्याचा तपास लावु-पीएसआय दबडे यांनी पंढरपूर लाईव्हला दिली माहिती बघा व्हिडीओ ..
पंढरपूर शहरातील महिला अर्बन बँकेच्या पाठीमागील सौ.आशा गोपाळ उर्फ मधुसुदन जव्हेरी यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी काल दि. 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास रोख रक्कम एक लाख 20 हजार व सोने चांदीचे दागिण्यांसह एकुण 7 लाख 46 हजार 500 रुपयांची चोरी केली असल्याची फिर्याद सौ.जव्हेरी यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिली होती.
याबाबत पंढरपूर शहर पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की, वरील वेळी व ठिकाणी फिर्यादीचे स्वयंपाक खोलीत ठेवलेले दागिणे ज्यामध्ये सोन्याचे गंठण, सोन्याचा राणीहार, मोहनमाळ, सोन्याचा नेकलेस, फॅन्सी नेकलेस, दोर्याचा सोन्याचा नेकलेस, तोडेजोड सोने, सोनेकांचन, कानातील पांढरा खडा असलेले सोन्याची साखळी टॉप्स, सोन्याच्या नक्षीच्या अंगठया, रस्सी चैन, चांदीचे ताट, फुलपात्र, वाटी, करंडा असे दागिणे व सुटकेसमध्ये ठेवलेली 1 लाख 20 गहार रुपयाची रोख रक्कम असा एकुण 7 लाख 46 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरुन पोबारा केला आहे. या गुन्हयाची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली असून अज्ञात आरोपीविरुध्द भा.दं.वि. कलम 380 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोसई गोसावी हे करीत आहेत.
दरम्यान आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर लाईव्ह ने पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.विठ्ठल दबडे यांच्याशी संपर्क साधला असता या गुन्ह्यातील कांही संशयीतांना आम्ही शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी चालु आहे. लवकरच यातील सर्व आरोपींना गजाआड करुन या गुन्ह्याचा तपास लवकरच लावला जाईल अशी माहिती दिली.
चोरीस गेलेला मुद्देमाल खालीलप्रमाणे


