- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 6 october 2017
पंढरपूर दि. 05 – ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक 2017 अंतर्गत तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे निडणूक विषयक प्रथम प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले . प्रांत कार्यालय सांस्कृतिक भवन, पंढरपूर येथे ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्तअधिकारी व कर्मचारी यांच्या जबाबदारी याबाबतचे प्रशिक्षण तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिले.
या शिबीरात पावर पॉईंट स्क्रीनव्दारे मुद्देनिहाय सर्व प्रकिया उपस्थितांना समजावून सांगताना मतदान सुरु होण्यापुर्वीची तयारी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर निवडणुक प्रकिया कशी पार पाडावी. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या 11 पुराव्यापैकी एक पुरावा काळजीपुर्वक तपासावा व बोगस मतदान होणार नाही यांची दक्षता घेण्यात यावी असे तहसीलदार बर्गे यांनी सांगीतले . तसेच मतदारांशी सौजन्याने वागून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावरील सर्व अधिकारी व कर्मचा-यांमध्ये समन्वय गरजेचा असला पाहिजे असे ही तहसीलदार बर्गे यांनी सांगितले.
यावेळी नायब तहसीलदार एस.पी. तिटकारे, निवडणूक शाखेचे राजेश सावळे, जी.ए.सगेल तसेच तहसिल कार्यालयातील कर्मचारी तसेच नियुक्त प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

