👁 10 Views

पंढरपूर शहर पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने 24 तासात लावला साडे सात लाखाच्या चोरीचा तपास… सर्व आरोपींसह चोरलेला मुद्देमाल 100 टक्के हस्तगत..! न्यायालयाने सुनावली आरोपींना पोलिस कस्टडी..!

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 6 october  2017 
पंढरपूर शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई चंद्रकांत गोसावी व त्यांच्या टीमने पोलिस अधिक्षक विरेश प्रभू, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांचे सुचनेवरुन व सहा. पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा संपुर्ण तपास अवघ्या 24 तासात लावण्यात यश मिळवले आहे. याविषयी पंढरपूर लाईव्ह शी बोलताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे (डीबी) पोसई चंद्रकांत गोसावी यांनी पुढील प्रमाणे माहिती दिली… बघा व्हिडीओ






पंढरपूर शहरातील पंढरपूर अर्बन बँक महिला शाखेच्या पाठीमागील सौ.आशा गोपाळ उर्फ मधुसुदन जव्हेरी यांचे राहते घरातून सोन्या-चांदीच्या दागिणे व रोख रक्कमेसह एकुण 7 लाख 47 हजार रु. चा मुद्देमाल आरोपींनी चोरला होता. ही घटना दि. 4 ऑक्टोबर रोजी घडली होती. या गुन्ह्याची नोंद दि. 5 ऑक्टोबर रोजी झालेली होती.  या गुन्ह्याचा तपास शीघ्र गतीने लावणेसाठी येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेने तातडीने सुत्रं हलवून यातील आरोपी योगेश राजकुमार आवताडे (21), प्रकाश माधव दांडेकर (27), गणेश सतीश मंजरतकर (25), श्रीमती गीता दिपक पवार (30) सर्व रा. पंढरपूर या आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींकडून चोरीस गेलेले सर्व दागिणे व रोख रक्कम 1 लाख 20 हजार रुपये असा एकुण 100 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यातही यश मिळवले आहे. 


पोलिस अधिक्षक विरेश प्रभू, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांचे सुचनेवरुन व सहा. पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई चंद्रकांत गोसावी, सपोफौ. हनमंत देशमुख, पोहेकॉ सुजित उबाळे, पोना सचिन गवळी, पोना महिबुब शेख, गणेश पवार, विशाल घाटगे, किशोर गायकवाड, राहुल रणनवरे, मच्छिंद्र राजगे, संदीप पाटील, इरफान शेख, केशव सुर्वे यांनी ही कामगिरी केली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून या कामगिरीबाबत पंढरपूरकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *