👁 12 Views

माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे कार्य प्रेरणादायी – प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे

पंढरपूर Live च्या सर्व दर्शकांना, जाहिरातदारांना व आमच्या हितचिंतक मित्रपरिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! ही दिपावली तुम्हा सर्वांना सुख-शांती-समृध्दी व आरोग्यदायी व भरभराटीची जावो हीच श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना..!
  • 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 15 October 2017

स्वेरीत ‘वाचक प्रेरणा दिना’चे उदघाटन करताना संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सोबत डावीकडून प्राध्यापक वर्ग व मेसाचे विद्यार्थी.

स्वेरीमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा
पंढरपूर – भारताचे माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या संशोधनात्मक साहित्यातून व अदभूत कार्यातून तरुणाईला प्रचंड आत्मविश्‍वासाचे बळ दिले आहे. त्यांच्या निर्मितीशील, प्रयोगशीलतेतून भारत जागतिक महासत्ता बनू शकेल हे त्यांचे स्वप्नहा त्यांचा आशावाद युवकांच्या मनात खोलवर रुजला असून त्यांच्या कार्याचा आदर्श घेत विद्यार्थ्यानी उत्तम साहित्य व संशोधनाकडे वळले पाहिजे.’ असे मत स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी व्यक्त केले.
           भारताचे थोर शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ पीजेअब्दुलकलाम यांच्या स्मरणार्थ पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकीमहाविद्यालयात मॅकेनिकल इंजिनिरिंगच्या मेसा (मॅकेनिकलइंजिनिरिंग स्टुडंट्स असोसिएशनतर्फे वाचन प्रेरणा दिनविद्यार्थ्यांनी साजरा केला. याप्रसंगी संस्थेचे सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. रोंगे विद्यार्थ्यांच्या उपक्रमावर मार्गदर्शन करत  होते. डॉ.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे (१५ ऑक्टोबर औचित्य साधून  या निमित्तानी विद्यार्थ्यांनी उपक्रम रावलाडॉ. अब्दुलकलामांना वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली देण्याचे ठरविले. मेसा मधीलविद्यार्थ्यांनी एकत्र येवून सुपीक कल्पनेद्वारे उपक्रम राबविण्याचे ठरविले. शास्त्रज्ञ डॉ. कलामांना वाचनाची आवड होती ते आपणया भाषणात युवा तरुणांना व विद्यार्थ्यांना वाचण्याचे महत्व पटवून देतअसे. त्यामुळे वाचन दिनाच्या निमित्ताने सलग तीन दिवस प्रदर्शनभरविले. या प्रदर्शनामध्ये डॉ. कलाम यांच्या विवि मिसाईल्सचीमाहिती, त्यांचे विचार, त्यांची लिहिलेली पुस्तके, त्यांना मिळालेलीविवि पुरस्कार, त्यांचा विज्ञान क्षेत्रातला अनुभव, त्यांचा जीवनप्रवास या सर्व गोष्टींची माहिती भव्य पोस्टर्सवर छापून या पोस्टर्सचेउत्कृष्ट प्रकारचे विध्यार्थ्यांसाठी सादरीकरण केले. भारतरत्नडॉ.कलामांचे प्रेरणादायी व्हिडिओत्याचे प्रेरणादायी भाषणे  त्यांचेआत्मचरित्र या व्हिडिओद्वारे मोठ्या हॉलमध्ये दाखवण्यात आले.त्यांचे विविध प्रकारचे मिसाईल्सचे व्हिडिओ देखील सगळ्यांनामोहक व आकर्षक  वाटलेहे सर्व करत असताना विदयार्थ्यांनीशास्त्रज्ञ कलामांचे सर्व पुस्तके असलेल्या ग्रंथ भंडाराला देखील आमंत्रित केले होते. त्याचे प्रदर्शन कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वार जवळठेवण्यात आले. तेथून विद्यार्थ्यांनी लामांची प्रेरणादायी पुस्तकेविकत घेतली. हे करत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून येत होताप्रदर्शन अभिप्राय वहीतून उत्कृष्ठ अभिप्रायवाचण्यास मिळाली. या वेळी प्राचार्य डॉ. रोंगे पुढे म्हणाले की, ‘स्तुत्य उपक्रमामुळे कलामांचा  न्मान असलातरी हा उपक्रमविद्यार्थ्यांच्या जीवनाला नवीन दिशा प्रेरणा व उर्जा मिळेल. अशाप्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढूनसकारात्मक भूमिका घेण्याची मानसिकता निर्माण होवून भविष्यात डॉ. कलामांनी पाहिलेल्या व्हिजन २०२० साठीलाभदायी ठरेल  विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे प्रेरणादायी उपक्रमभविष्यातही राबवावेत. प्रदर्शनात मिसाईल रॉकेट आकर्षक पद्धतीने बनविले होते. प्रदर्शन पाहण्यासाठी विध्यार्त्यांनी तीनही दिवस प्रचंड गर्दी केले होते. तर कॅम्पसमध्ये भरविलेल्या उत्तमोत्तम पुस्तकांच्या प्रदर्शन व विक्री स्टॉलमधून डॉ.कलमांच्या स्फूर्तिदायक विचार सुभाषीतांच्या पुस्तकांची विद्यार्थी खरेदी करत होते. तीन दिवसात साधारण दीड हजाराहून अधिक बौद्धिक पुस्तके विद्यार्थ्यांनी खरेदी केल्याचे श्री विठ्ठल ग्रंथ भांडारचे संचालक ऋषिकेश यवनकर यांनी सांगितले. यावेळी स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर तीनही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली व माहिती जाणून घेतली तर काही विद्यार्थ्यांनी पुस्तके खरेदी केली. यावेळी अधिष्ठाता डॉ.एस.एम. मुकणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.करण पाटील, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी, अधिष्ठाता डॉ. अभयउत्पातमॅकेनिकल इंजिनिरिंग विभाग प्रमुख डॉ. पी.एस. कचरे, प्रा. आर.आर. गिड्डे  मेसा समन्वयक प्रा. . के. पारखे तरविद्यार्थ्यामध्ये मेसा अध्यक्ष आशिष शहाणे, नितीन कदम, प्रज्योघोंगडे, जगदीश पिसे, ज्ञानराज तेलंग, शुभम शहाणे, शशिकांत तुपे, तोहीद शेख, किरण गायकवाड, सागर बागेवाडी, प्रथमेश म्हमाणे, सागर कोळी, ज्योती देशमुख, सुप्रिया कोळेकर यांच्यासह इतर विद्यार्थी, प्राद्यापकवर्ग उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *