👁 11 Views

बैलगाडा शर्यतीसाठी पुणे जिल्ह्यात खा.शिवाजीराव आढळराव पाटील व शेतकरी बांधवांची बैठक बैलगाडी शर्यत सुरु करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आंदोलनाची तयारी..!

पंढरपूर Live च्या सर्व दर्शकांना, जाहिरातदारांना व आमच्या हितचिंतक मित्रपरिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! ही दिपावली तुम्हा सर्वांना सुख-शांती-समृध्दी व आरोग्यदायी व भरभराटीची जावो हीच श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना..!
  • 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 15 October 2017


 

आज रविवार दि.15 ऑक्टोबर 2017 रोजी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी, ता.आंबेगाव येथील निवासस्थानी बैलगाडा मालक शेतकर्‍यांची बैठक संपन्न झाली.


सदर बैठकीसाठी पुणे जिल्ह्यातील शेकडो बैलगाडा मालक उपस्थित होते. यावेळी बैलगाडा मालकांनी प्राणी मित्र संघटनेविरोधात तीव्र भावना व्यक्त करत महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा मालक, शेतकरी यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्रातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शनिवार दि. 28 ऑक्टोबर 2017 रोजी चाकण, ता-खेड, जि-पुणे येथे होणार्‍या राज्यव्यापी आंदोलनात 50 हजार शेतकरी सहभागी होण्याचा अंदाज बांधुन सरकार व स्वयंघोषित प्राणीमित्रांविरोधात अंतिम लढाईसाठी  आर या पार ची घोषणा करून सरकारला सळोकी पळो करून सोडण्याचा निर्धार केला.


हा लढा शेतकरी, बैलगाडा मालक व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी असुन सर्व शेतकरी बांधवांनी व लोकप्रतिनिधींनी आपापसातील पक्षीय मतभेद बाजुला सारून शेतकरी व बैलगाडा मालक हाच केंद्रबिंदु माणुन ह्या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी व्हावे असे अवाहन सर्व बैलगाडा मालकांनी यावेळी केले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *