👁 8 Views

संतोष अधटराव खुन प्रकरणी काल अटक केलेल्या दोन आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी.. गुन्हयातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता!

संतोष अधटराव खुन प्रकरणी काल अटक केलेल्या दोन आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी.. गुन्हयातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता!

पंढरपूर Live 2 November 2017

मोहोळ(दादासाहेब गायकवाड) 
संपूर्ण जिल्‍ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर येथील संतोष अधटराव खुण प्रकरणी पुन्हा ताब्यात घेतलेल्या दोन जणाना दि २ रोजी न्यायालयात हजर केले असता त्याना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २५ आक्टोबर रोजी आरोपी संतोष कानोरे यांनी आपला मित्र संतोष अधटराव यास मोहोळ तालुक्यातील शेजबाभुळगावच्या हद्दीत       जमिनीच्या व्यवहाराचे खोटे कारण सांगून एम/एच १२ ए एफ ६४८३ या कारमधून आणून लघुशंकेच्या निमित्ताने गाडी उभी करून पाठीमागून उसाच्या कोयत्याने वार करून खून करून पळ काढला होता.


याबाबतचा गुन्हा मोहोळ पोलिसात दाखल होताच जिल्हा पोलिस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के सपोनि निलेश बडाख, पोलीस नाईक विलास रणदिवे, मुन्ना बाबर, विशाल गायकवाड, महेश कोळी, दत्तात्रय वाघमारे यांनी तातडीने  संतोष कानोरे यास गाडीसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरचा खून व्याजाचे पैसे वेळोवेळी देऊन सुद्धा पुन्हा पैश्याची मागणी करून तसेच आपल्या पत्नीवर वाईट नजर ठेवल्यामुळे खून केला असल्याची कबुली दिली होती.
       दरम्यान पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवून अधिक तपास केला असता संतोष कानोरे यांनी या खुनामध्ये शंकर बिभीषण सुरेराव वय ३३ रा.लक्ष्मीपेठ दमाणीनगर सोलापूर व धनंजय वसंत अधटराव वय ४५ रा.हनुमान मैदान पंढरपूर या दोघांचा या खुनाच्या कटामध्ये सहभाग असून खून करतेवेळी हे दोघे माझ्याबरोबर होते असे त्यांनी सांगितल्याने मोहोळ पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली होती त्या दोघा जणाना आज दि २ रोजी न्यायालयात हजर केले असता त्याना पाच दिवसाची पोलीस कोठडी देन्यात आली आहे याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश बडाख करीत असुन या प्रकरणात आणखीण आरोपी वाढण्याची शक्यता पोलीस सुत्राकडुन वर्तवली जात आहे.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *