👁 10 Views

मोहोळ पोलीसांकडुन अवघ्या सहा तासात जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस, एका आरोपीस अटक करून माल हस्तगत

मोहोळ पोलीसांकडुन अवघ्या सहा तासात जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस, एका आरोपीस अटक करून माल हस्तगत


पंढरपूर Live 3 November 2017  

मोहोळ(दादासाहेब गायकवाड) 

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी 
संपर्क  मुख्य संपादक– भगवान वानखेडे    

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
अल्ट्राटेक कंपनीचे सिमेंट घेवुन मुंबईकडे निघालेल्या 12 चाकी टाटा मालट्रकला अडवून चालकास मारहाण करून चालका जवळील रोख रक्कम एक हजार रूपये व मालट्रक किंमत 10,00,000 व त्यामधील सिमेंट किंमत 1,17,196 रूपये असा एकुण 11,18,196/-रूपयाचा माल चोरून नेला व मालट्रक घेऊन पोबारा केला ही घटना दि 2 नोव्हेंबर रोजी रात्री 12.00 च्या दरम्यान सोलापूर पुणे हायवेवरील वडाचीवाडी ता मोहोळ येथे घडली. मात्र सहा तासात तपासचक्रे फिरवून मोहोळ पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन मुसक्या आवळल्या.


    याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 02 नोव्हेंबर रोजी रात्री 12.00 वा च्या सुमारास सोलापुर ते पुणे हायवे रोडवरून शामराव दशरथ साळवे वय 27 धंदा ड्रायव्हर रा. मोहरी ता. जामखेड जि.
अहमदनगर हा त्याचे कडील टाटा कंपनीचे बारा टायर मालट्रक क्रमांक एम.एच.09/बी.सी. 8616 मधुन अल्ट्राटेक कंपनीची 420 पोती सिमेंट घेवुन मुंबईकडे जात असताना सोलापूर पुणे हायवेवरील वडाचीवाडी गावच्या शिवारात 25 ते 30 वयोगटातील अनोळखी तीन इसमानी लाल रंगाचे हिरोहोंडा स्प्लेंडर मोटार सायकल वरून येऊन मालट्रक चालकास मारहाण करून त्याच्या जवळील रोख रक्कम एक हजार रूपये व मालट्रक किंमत (10,00,000) व त्यामधील सिमेंट किंमत (1,17,196) रूपये असा एकुण 11,18,196/-रूपयाचा माल  चोरून नेला तसेच सदर मालट्रक घेऊन तेथून पळ काढला होता. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. 873/2017 भा.द.वि कलम 394,34 प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णु गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला होता घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तपासचक्रे फिरवून सदरचा मालट्रक टेंभुर्णी कडे गेला असल्याची माहिती मिळताच टेंभुर्णीकडे एक पथक रवाना झाले तिकडे शोधाशोध केली असता चोरीस गेलेला मालट्रक एका ठिकाणी रिकाम्या अवस्थेत आढळून आला तसेच ट्रकच्या असपास राम दशरथ काटे रा. उपळाई ता. माढा हा संशयीतरित्या फिरत असल्याने पोलीसांनी त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवुन तो ट्रकचे जवळ येताच त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चेोकशी केली असता त्याने गुन्हा केेल्याची कबुली दिली व चोरून नेलेले सिमेंट माढा येथे ठेवल्याचे सांगितल्याने पोलीस निरीक्षक राजेंद मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णु गायकवाड,  यांनी लागलीच तपासाची चक्रे फिरवुन माढा येथे ठेवलेले सिमेंटही हस्तगत केले.
    सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणणे करिता पोलीस अधीक्षक ग्रामीण विरेश प्रभु, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णु गायकवाड हे करीत आहेत.


 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *