औरंगाबाद दि.१५ राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी ५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही ऑफर दिली होती असे आ. हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. ‘माझ्या बरोबरच इतर २५ आमदारांना भाजप प्रवेशासाठी पैशांची ऑफर देण्यात आली होती. गेल्या महिन्यात महसूलमंत्री पाटील यांनी एका भेटी दरम्यान ही ऑफर दिली होती असा दावाही आ. जाधव यांनी केला आहे.
‘महसूल मंत्री पाटील यांनी गेल्या महिन्यात एका भेटी दरम्यान भाजप प्रवेशासाठी ५ कोटींची ऑफर दिली होती. माझ्यासह २५ आमदारांना भाजपकडून ही ऑफर देण्यात आली होती. पक्षात आल्यास निवडणुकीचा खर्च भाजपकडून करण्यात येईल, असे पाटील यांनी यांनो या वेळी सांगितले होते. असे कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना त्यांनी हा खळबळजनक गोप्यस्फोट केला आहे.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




