👁 5 Views

कापसाच्या अत्यल्प भावामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघेना! जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल


पंढरपूर Live 15 NOVEMBER 2017
कापसाच्या अत्यल्प भावामुळे उत्पादन खर्चसुद्धा निघेना!
 जिल्ह्यातील  शेतकरी हवालदिल
 
बीड : बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतक-यांना मजुरासाठी शोधाशोध करावी लागत आहे़ अशातच शासनाने कापसाला जाहीर केलेला हमीभाव अत्यंत कमी व खाजगी व्यापारीही अल्पदर देत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़
एकरी कापसाच्या पिकाला वेचण्यापर्यंतचा खर्च अंदाजे २५ हजार रुपयांच्या आसपास आहे़ यात उत्पादन ५ ते ७ क्विंटल होत असते़ मात्र सध्या प्रतिक्विंटल ४३५० ते ४४०० इतका कापसाला दर मिळत आहे़ याची आकडेवारी काढली तर शेतक-याच्या हाती काहीच लागत नाही़ त्यामुळे शेतकरी संतापला असून कापसाला कमीत कमी ७ हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी होत आहे़
मजुरांचा अभाव
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात मजुरांचा अभाव असल्यामुळे बाहेर गावातून कापूस वेचणीसाठी मजूर आणावे लागत आहेत़ त्यांना प्रती १० रुपये किलो दराने भाव द्यावा लागत आहे़ मजुरांना आणणाºया गाडीच्या खर्चाचा अधिकचा भर पडत असल्याने पुढील वर्षी कापसाचे पीक घ्यावे की नाही या विवंचनेत शेतकरी सापडला आहे़
 
शेतकºयांची दिशाभूल करीत हमीभावापेक्षा कवडीमोल दराने कापसाची खरेदी 
शेतक-याच्या थेट दरवाजापर्यंत जावून त्यांना फूस लावून व्यापा-यांकडून शेतक-यांची मोठ्या प्रमाणावर लुटमार होत आहे़ शेतकºयांची दिशाभूल करीत हमीभावापेक्षा कवडीमोल दराने कापसाची खरेदी व्यापारी करीत असून यात अनेक दलाल सक्रीय आहेत़ अशा प्रकारची खरेदी न करण्याचे आदेश सरकारने दिले होते़ मात्र त्याला न जुमानता व्यापारी वर्गाने आपला व्यवसाय चालू ठेवला आहे़ आणि
शासनाने जाहीर केलेल्या भावात उत्पादन खर्चही भरून निघत नाही़ त्यामुळे मोठी नामुष्की ओढावली आहे़ शासनाने विचार करून कमीत कमी ७हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी मराठा आरक्षण विद्यार्थी क्रुर्ती समितीचे बीड जिल्हाप्रमुख निलेश चाळक यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना केली आहे

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *