पंढरपूर तालुका आव्हे येथील क्वालिटी इंग्लिश स्कुल व रत्नमहर्षि हायस्कुलने आयोजित केलेल्या शारिरीक व मानसिक या विषयावर आरोग्यतज्ञ डॉ.सुधीर पोफळे यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, कसदार शरिर हेच तल्लख बुद्धीचे गमक आहे. 
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सस्वती पुजनाने व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहून करण्यात अली. यावेळी डॉ.विश्वास कदम, डॉ.अॅड. बाळकृषगण नष्टे, संस्थापक अध्यक्ष नवनाथ जगताप, मा.सरपंच लहु यमगर, कृषी अधिकारी दादासो तळेकर, विठ्ठल सहकारीचे शहाजी पाटील उपस्थित होते.
प्रथमत: डॉ. पोफळे यांनी या जगातील सर्वांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून धन्वंतरी चरणी प्रार्थना केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, धावपळीच्या या काळात आहाराकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे शरिराला पुरेशी जीवनसत्वे मिळत नाहीत. यामध्ये कॅल्शीयम, लोह, आयोडीन, मॅग्नेशियम, ही शरिरातील अत्यंत महत्वाची जीवनसत्वे असून फळे, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्यातून ही जिवनसत्वे पुरेशा प्रमाणात मिळतात. परंतु यांच्या अभावामुळे हृदयरोग, कावीळ, अशक्तपणा, थायरॉड, सोरायसीस इ. रोगांना सामोरे जावे लागते. तर पालकांनी विद्यार्थ्यांना व्यायामातून सदृढ, कसदार शरीर व सात्वीक आहारातून तेजोमय तल्लख बुध्दी बनविण्याचे आवाहन केले.
लवकर निजे-लवकर उठे तयासी आरोग्यसंपदा मिळ अशा शब्दशैलीत अॅड. बाळकृष्ण नष्टे यांनी आपले मत मांडले. सात्वीक रजस व तामसिक आहाराचे विवरण करत सात्वीक आहार शरिराला व बुध्दीला तेजोमय करण्यासाठी विद्यार्थी दशेत अत्यंत महत्वपुर्ण आहे. असे सांगितले.
यावेळी फॅबटेक शुगरचे कृषी अधिकारी दादासाो तळेकर म्हणाले की, अतिशय नाविण्यपुर्ण व उपक्रमशील असणार्या या संस्थेच्या माध्यमातून चिखलगोळ्याप्रमाणे असणारे विदयार्थी एक जबाबदार नागरिक बनत असताना दिसत आहेत. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्याप्रमाणे ज्ञानाचे हे मंदिर स्यशिवाहून सुंदर हे… मोती होतील घामाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे… या उक्तीप्रमाणे व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचे दाखल ेदेत याही संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील दीन-दलित, शेतकरी, गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात नेण्याचं कार्य कौतुकास्पद व उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रक्षाळे मॅडम तर आभार अमोल यांनी मानले. संस्थेचे संचालक युवराज जगताप, मा.सरपंच भगवान माने, ग्रा.सदस्य शिवाजी रोडगे, मुकुंद खाळ, विनोद जगताप, ज्ञानोबा बनसोडे, बापु चोरमले आदींसह अनेक मान्यवर व संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येनेे उपस्थित होते.
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




