पंढरपूर Live 22 NOVEMBER 2017
मुंबई, दि.22 : सिद्धार्थ नगर गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसनाच्या कामाबाबत चुकीची माहिती देणाऱ्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मंत्रालयात आज आयोजित पत्राचाळ आणि गोरेगावच्या मीठानगर वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, अनेक वर्षापासून विकासकांनी घराचे बांधकाम रखडवले आहे. चाळीतील रहिवाश्यांचे घरभाडे विकासकाने वर्षभरापासून दिलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्याधिकारी सुभाष लाखे आदी उपस्थित होते.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





