👁 7 Views

माजी मंञी सुरेश धस व आ,जयदत्त क्षीरसागर यांची भेट :बंद दरवाजाआड तासभर चर्चा :राजकिय वर्तूळात तर्कवितर्क

माजी मंञी सुरेश धस व आ,जयदत्त क्षीरसागर यांची भेट :बंद दरवाजाआड तासभर चर्चा :राजकिय वर्तूळात तर्कवितर्क



पंढरपूर Live 25 NOVEMBER 2017

निलेश चाळक बीड : राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबित केल्यानंतर भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या माजी मंत्री सुरेश धस यांची आ. जयदत्त क्षीरसागर यांनी गुरुवारी  भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बंद दरवाजाआड तासभर चर्चा रंगली. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गेल्या आठवड्यातच बाळासाहेब आजबेंना राकाँमध्ये प्रवेश देत धसांवर तोंडसुख घेतले होते. राष्ट्रवादीने नामोहरम केलेल्या धसांसोबत आ. क्षीरसागरांनी हितगूज साधल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
सुरेश धस व जयदत्त क्षीरसागर हे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीत सोबत होते. धनंजय मुंडे यांच्या ‘एंट्री’नंतर पक्षाने त्यांना विरोधी पक्षनेतेपद देऊन बळ दिले. त्यानंतर मुंडेंनी राज्याचा नेता म्हणून जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात लक्ष घातले. नेमकी हीच बाब माजी मंत्री धस व आ. क्षीरसागर यांना रुचली नाही. पत्नीच्या जि.प. निवडणुकीतील पराभवाला राष्ट्रवादीचे नेतेच जबाबदार असल्याचा घणाघात धसांनी मुंडेंवर केला होता. त्यानंतर धस यांनी जि.प. अध्यक्ष निवडीदररम्यान भाजपची पाठराखण केली. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीने बाहेरचा रस्ता दाखवला. इकडे आ. क्षीरसागरांचे बंडखोर पुतणे संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीने रसद पुरविली. बीडमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीतील मेळाव्यात आ. क्षीररसागरांना दूर ठेवण्यात आले. शिवाय नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडील जिल्हाध्यक्षपद काढून मुंडे यांचे खंदे समर्थक बजरंग सोनवणे यांना संधी देण्यात आली. त्यामुळे आ. क्षीरसागर राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. ते तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीत असले तरी जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यक्रमांत फारसे दिसत नाहीत.
धस- क्षीरसागरांत जुनाच स्रेह आहे. मात्र, आता मित्राचा शत्रू तो आपला शत्रू या न्यायाने या दोघांतील सख्य आणखीत वाढतच असल्याचे दिसत आहे.  गुरुवारी आ. क्षीरसागर लग्नसमारंभानिमित्त आष्टी दौऱ्यावर होते.  अहमदनगर येथे लग्नसमारंभ आटोपून रात्री १० वाजता ते आष्टीत परतले. यावेळी आ. क्षीरसागरांची गाडी थेट धस यांच्या बंगल्याकडे वळाली. धसांनीही त्यांचे आदरातिथ्य केले. यावेळी सुरेश धस यांचे पुत्र जयदत्तही उपस्थित होते. या तिघांशिवाय चौथ्याला बैठकीत ‘एंट्री’ नव्हती. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? याचा तपशील बाहेर आला नाही; परंतु राकॉने दरवाजे बंद केलेल्या धस व पक्षात असूनही कोंडीत सापडलेल्या क्षीरसागरांच्या भेटीने राजकीय वर्र्र्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सुरेश धस हे भाजपच्या वाटेवर आहेत; परंतु अद्याप त्यांना प्रवेश न मिळाल्याने ‘न घर का ना घाट का’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. ‘पुतणेशाही’मुळे आ. क्षीरसागरांची स्थितीही वेगळी नाही; परंतु अद्याप त्यांच्या मनगटावर ‘घड्याळ’ घट्ट आहे. राजकीयदृष्ट्या कोंडीत सापडलेले हे दोन दिग्गज येत्या काळात आपली राजकीय ‘वाट’चाल कशी सुकर करतात ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
पक्षांतर्गत विरोधकांना शह
धसांच्या निलंबनानंतर राष्ट्रवादीला सावरण्यासाठी जि.प. सदस्य बाळासाहेब आजबेंना पक्षात खेचण्यात आले. गेल्या आठवड्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभा घेऊन आजबेंना प्रवेश दिला. यावेळी पवारांसह धनंजय मुंडे यांनी धसांवर तोफ डागली होती. यावेळी आ. अमरसिंह पंडित, जि.प. सदस्य संदीप क्षीरसागर यांचीही उपस्थिती होती. पक्षांतर्गत विरोधकांना शह देण्यासाठी आ. जयदत्त क्षीरसागरांनी राजकीयदृष्ट्या राकॉच्या निशाण्यावर असलेल्या धसांची आवर्जून भेट घेतल्याची चर्चाही आहे.

प्रीतम मुंडेंनीही घेतली धसांची भेट
लग्नसोहळ्याच्या निमित्ताने शुक्रवारी खा. डॉ. प्रीतम मुंडे या देखील आष्टीत होत्या. सोहळा आटोपल्यावर त्यांनी धस यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी पक्षप्रवेशाचा विषय झाला नाही; परंतु शेतकऱ्या
च्या प्रश्नांवर चर्चा झाली. तूर खरेदी केंद्रे सुरु करण्यासाठी पुढाकार घ्या, शेतकऱ्याच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा असा सल्ला खा. मुंडे यांनी धसांना दिल्याचे समजते. यावेळी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *