👁 9 Views

लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी महिला पोलीस कॉन्स्टेबलला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागण्याचे हायकोर्टाचे निर्देश



पंढरपूर Live 29 NOVEMBER 2017

निलेश चाळक बीडलिंगबदल शस्त्रक्रियेसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणा-या माजलगावच्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले. हे प्रकरण प्रशासकीय सेवेशी निगडित असल्याने याचिकाकर्त्यांनी थेट हायकोर्टात न येता आधी ‘मॅट’ मध्ये दाद मागणे अपेक्षित असल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.
बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात काम करणा-या ललिता साळवेंनी लिंगबदल शस्त्रक्रियेकरता सुट्टी द्यावी, असा अर्ज केला. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासह महाराष्ट्र पोलीसदलच नाही तर राज्याचे गृह विभागदेखील यासंदर्भात पुढे काय करायचे याचा विचार करत आहेत. कारण ललिताने मागणी लावून धरलीय की, ऑपरेशननंतरही पोलीस दलातील आपली नोकरी कायम राहावी. ललिता २३ जूनला मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये हार्मोन्स आणि शारीरिक चाचणी करता भरती झाली. २-३ तास चाचणी झाल्यानंतर जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या महिला पोलिसाला लिंग बदलण्यास हिरवा कंदील दाखवला.
त्यानंतर १७ सप्टेंबर २०१७ ला या महिला कॉन्स्टेबलने पोलीस अधीक्षक बीड यांना पत्र लिहून लिंग बदलाकरता सुट्टी पाहिजे, असा अर्ज केला. त्याची प्रत पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनाही मेलद्वारे पाठवण्यात आली. पण, या महिला पोलिसाची महिला गटातून पोलीस दलात भरती झाली आहे, त्यामुळे लिंग बदलानंतर या महिलेला नोकरीला मुकावे लागेल असे पोलीस अधीक्षक कार्यालयातून सांगण्यात आले आहे. त्यानंतर तिने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *