👁 8 Views

ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नाने शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला न्याय कांदा पिकाचा रब्बी पिक विमा योजनेत समावेश



पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017

परळी वै. (प्रतिनिधी, महादेव गीते):-  परळी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून पंतप्रधान रब्बी पिक विमा योजनेपासून वंचित राहिले होते. या बाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्याकडे मांडवा सह अन्य गावातील शेतकऱ्यांनी समावेशा बाबत आग्रह धरला होता.ना.धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला असून रब्बी पिक विमा योजनेत कांदा पिकाचा समावेश करण्यात आला आहे. 
      परळी तालुक्यातील मांडवा सह अन्य गावातील  कांदा उत्पादक शेतकरी मोठय़ा प्रमाणावर कांदा लागवड रब्बी हंगामात करतात. असे असताना ही पीकविमा योजनेत मात्र परळी तालुक्यातील कांदा हे पीक समाविष्ट नव्हते. याबाबत मांडवा येथील ग्रामपंचायत सदस्य मोहन साखरे व शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. या बाबतीत ना. मुंडे यांनी संबंधित विभागाला सुचना दिल्या व कांदा पिकाचा समावेश करण्याचे निर्देश दिले. 
       या वर्षीच्या  रब्बी पीकविमा योजनेत परळी तालुक्यातील कांदा पिकाचा समावेश झाला असून त्याबाबत अधिकृत शासन परिपत्रकात तसा उल्लेख करण्यात आला आहे. कांदा उत्पादन घेणार्‍या शेतकऱ्यांना या मुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या बद्दल शेतकऱ्यांनी ना. धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत. 
      दरम्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची जाण असणारे ना. धनंजय मुंडे यांचे नेतृत्व असून शेतकऱ्यांना येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणी सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. त्याच पद्धतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वंचित राहावे लागलेले  वीमासंरक्षण त्यांनी मिळवून देऊन शेतकऱ्यांना न्याय दिला असल्याचे मांडवा  ग्रा. पं. सदस्य तथा कांदा उत्पादक शेतकरी मोहन साखरे यांनी सांगितले आहे.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *