पंढरपूर Live 3 December 2017
परळी वैजनाथ(प्रतिनिधी, महादेव गीते):- शहरातील पद्मावती गल्ली येथे दि.3रोजी दत्त जयंती निमित्त ह.भ.प.श्री.संपत महाराज गित्ते(गुरूजी ) यांचे सकाळी 11ते1या वेळेत कीर्तन होणार असुन याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन पद्मावती मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
पद्मावती मित्र मंडळाच्या वतीने पद्मावती गल्ली येथे दिनांक 27/11/2017रोजी पासुन अखंड हरिनाम सप्ताह रामकथा महोत्सव व गाथा पारायण सोहळा सुरू असुन सांगता दि.4/12/2017रोजी होणार आहे या दिवशी सकाळी 8ते10या वेळेत कलश दिंडी मिरवणुक निघणार असुन नंतर 11ते1या वेळी भागवताचार्य ह.भ.प.श्री तुकाराम महाराज मुंडे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे व तदनंत्तर महाप्रसाद होणार आहे तर एक दिवस अगोदर दि.3रोजी दत्त जयंती असुन या दिवशी सकाळी 11ते1या वेळेत ह.भ.प.श्री संपत महाराज गित्ते(गुरूजी)यांचे कीर्तन होणार आहे तरी भाविकांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे नम्रपुर्वक आवाहन पद्मावती मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





