पंढरपूर Live 3 December 2017
पंढरपूर : पंढरपूर शहरातील इसबावी येथील विठ्ठल कुस्ती आखाडा येथे चार व पाच डिसेंबर रोजी सोलापूर जिल्हा महाराष्ट्र केसरी माती व गादी विभागातील जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पै.दिपक चव्हाण व पै.बापू गोडसे यांनी दिली आहे.
चार डिसेंबर रोजी सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत पैलवानांची वजने घेतली जाणार आहेत. यावेळी महान भारत केसरी पै.मारूती जमदाडे, योगेश बोंबाळे, कुस्ती भुषण पै. अस्लम काझी यांचा यावेळी सत्कार करून सन्मान करण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन आ. भारत भालके यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठलचे संचालक राजुबापू पाटील, जिल्हाधिकारी संजय नाईक, विठ्ठलचे संचालक भगीरथ भालके, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले, विठ्ठलचे माजी संचालक शेखर भोसले, जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष सर्जेराव चवरे, पंढरपूर तालुका अध्यक्ष पै.विलास कंडरे आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




