पंढरपूर Live 5 December 2017
निलेश चाळक बीड: महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेसाठी येथील ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. तंटामुक्तीसोबतच दारूबंदीसाठी गावस्तरावर समिती गठीत करण्यात येणार आहे. सोमवारी ग्रामीण ठाण्यात झालेल्या मेळाव्यात यासाठी ६ गावांची निवड करण्यात आली.
उपअधीक्षक सुधीर खिरडकर, सहायक निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक गजानन जाधव यांनी यावेळी मार्गदर्शक केले.
बीड तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गावातील वाद गावातच मिटावेत, गावातील अवैध धंदे बंद करावेत यासाठी गावस्तरावर एक समिती तयार करण्यात आली आहे. समितीचे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि पोलिस पाटील यांचा समितीत समावेश राहणार आहे. ग्राम सुरक्षा दला च्या मदतीनें आणि पोलिस यांची मदत घेऊन सुरक्षेसाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यात पिंपरगव्हाण, लिंबारुई, कामखेडा, घोडका राजूरी, चऱ्हाटा यता गावांमध्ये समिती नेमून व्यसनमुक्तीवर काम केले जाणार आहे. या कामी ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्यांना गावे दत्तक देण्यात आली आणि त्या कर्मचार्याची ओळख संबधित गावच्या समिती पदाधिकाऱ्यांना करून देण्यात आली.
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





