पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 25 December 2017
बॅडमिटन स्पर्धेतून महाराष्ट्राला नवे खेळाडू मिळतील –राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांचे प्रतिपादन
—————————–
अंबाजोगाई (प्रतिनिधी) या स्पर्धेच्या आयोजना विषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टरसेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे म्हणाले की,या स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या परवानगीने आयोजित करण्यात आलेल्या आहेत.अंबाजोगाई शहरात नेहमी वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक, साहित्य,सामाजिक कार्य कार्यक्रम घेतले जातात त्याचाच एक भाग म्हणून या स्पर्धा लोकनेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने होत आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे आशा स्पर्धा नेहमी शहरी भागातच होतात. त्याचा ग्रामीण भागातील खेळाडूला काहीही उपयोग होत नाही.ग्रामीण भागातील खेळाडूंना या स्पर्धेच्या रूपाने एक नवीन दालन उघडण्याचा प्रविण देशमुख, रणजित लोमटे, रविकिरण देशमुख व त्यांच्या सहकार्यांचा विधायक प्रयत्न आहे. या आधीसुद्धा श्री अंबाजोगाई क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने तालुका, जिल्हा तसेच विभागीय एकेरी डबल स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूला एक प्लॅटफॉर्म निर्माण झाला आहे या स्पर्धेतील खेळाडू हे राज्य,देश व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी कामगिरी पार पाडत आहेत. याचा मनोमन आनंद वाटतो असे सांगुन या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
लोकनेते माजी केंद्रिय कृषीमंञी खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या 77 व्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत दि.24,25 आणि 26 डिसेंबर 2017 रोजी भव्य राज्यस्तरीय खुल्या पुरूष एकेरी बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेचा शानदार उदघाटन सोहळा रविवार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर आज सोमवार दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा. पहिले सत्रात राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, परळीचे तहसिलदार शरद झाडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमर देशमुख, मोरेवाडी ग्रा.प.सदस्य रणजित मोरे, यांच्या हस्ते व उपस्थितीत पहिल्या लढतीचा टॉस काढण्यात आला. अंबाजोगाईचा सुपुत्र व राष्ट्रीय बॅडमिटन खेळाडू अक्षय प्रभाकर राऊत आणि अनिकेत हत्ते (परळी वै.) यांच्या लढत झाली. या लढतीत अक्षय राऊतने विजय संपादन केला.स्पर्धेच्या आयोजना बाबतची माहिती देताना संयोजक प्रविण देशमुख यांनी सांगितले की राज्यातून 14 जिल्ह्यातील 82 संघांचा सहभाग आहे. श्री.अंबाजोगाई क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या पुढाकाराने होत असलेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत संपुर्ण राज्यांतून 14 जिल्ह्यातील 20 शहरांच्या सुमारे 82 संघांनी सहभाग घेतला आहे.यात मुंबई,ठाणे, नवी मुंबई,पुणे, बारामती,सातारा, कल्याण,नागपुर,
औरंगाबाद,लातूर, बीड,जालना,
उदगीर,परळी वैजेनाथ, हिंगोली,नांदेड, परभणी,अहमदनगर, यवतमाळ व अंबाजोगाई येथील संघांचा सहभाग आहे. अशी माहिती संयोजक प्रविण देशमुख यांनी दिली.प्रा.डॉ.प्रविण दिग्रसकर यानां त्यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी शुभेच्छा देवून त्यांचे अभिष्टचिंतन केले.
कार्यक्रमाचे बहारदार सुञसंचालन प्रा.डॉ.प्रविण दिग्रसकर यांनी करून उपस्थितांचे आभार श्रीनिवार मोरे यांनी मानले.या कार्यक्रमास बॅडमिंटनपटू व खेळाची आवड आसणारे नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्पर्धेच्या यशस्वितेसाठी कै.हेमंत राजेमाने बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण देशमुख,बॅडमिंटन प्रशिक्षक व मार्गदर्शक कैलास शेटे,डॉ.अनिल भुतडा,प्रा.डॉ.प्रविण दिग्रसकर,अनंत मसने, धवल इनामदार,संजय अरसुडे,श्रीनिवास मोरे,चेतन पाडे,तुषार जोशी,शरद लोमटे, महेश लोमटे,राहूल देशमुख,शाम तेलंग, दिनेश लोमटे,संजय पवार,किरण सेलमोहकर,वसंतराव कांबळे, यशवंतराव अरसुडे, डॉ.अशोक कटारे, श्रीपाद देशमाने,राजू चिंचकर, विजयकुमार आंधळे, नानासाहेब माने, प्रा.राहुलभैय्या माने,दत्ता सावंत,संदीप हजारी,प्रा.सुदिप झिरमिरे,गडकिल्ले प्रेमी संतोष कदम,इनामदार साहेब,शास्त्री साहेब, संकेत ढगे,श्रीकांत कुंबेफळकर,सारंगभैय्या भातलवंडे, हसन चाऊस,शरद शिंदे, बालाजी बासटवार, कृष्णा गायकवाड आदींनी पुढाकार घेतला आहे.
===================
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





