पंढरपूर LIVE 20 Jun 2018
राज्यातील दुय्यम न्यायालयातील सर्व संवर्गातील न्यायिक अधिकारी तसेच निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दुसरा राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाच्या अंतरिम शिफारशी 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र शासनाने राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातील न्यायिक अधिकाऱ्यांच्या वेतन संरचना व भत्ते तसेच सेवानिवृत्ती वेतन, सेवानिवृत्तीनंतरचे इतर लाभ, इतर अनुषंगिक बाबींचा अभ्यास करुन शिफारशी करण्यासाठी दुसरा राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोग स्थापन केला आहे. न्यायमूर्ती श्री. पी. व्ही. रेड्डी यांच्या अध्यक्षेखाली स्थापन करण्यात आलेल्या या आयोगाने 9 मार्च 2018 रोजी अंतरिम वेतन अहवाल सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने 27 मार्च 2018 रोजीच्या आदेशानुसार या आयोगाच्या अंतरिम शिफारशी न्यायिक अधिकारी, निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार, राज्यातील दुय्यम न्यायालयातील सर्व संवर्गातील न्यायिक अधिकाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून मूळ वेतनामध्ये30 टक्के वाढ देऊन नियमित वेतनवाढीसह अंतरिम वेतनवाढ देण्याची अंमलबजावणी 1 मे 2018 पासून करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ज्या न्यायिक अधिकाऱ्यांचे 1 मे 2018 रोजी भविष्य निर्वाह निधीचे खाते अस्तित्वात आहे, त्यांना 60 टक्के थकबाकी रोखीने मिळणार असून 40 टक्के रक्कम ही त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे. ज्या अधिकाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते अस्तित्वात नाही, त्यांना थकबाकीची रक्कम रोखीने देण्यात येईल.
तसेच सेवानिवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना देखील सुधारित मूळ वेतनावर वेतनवाढ देण्यात येणार आहे. त्यांना वाढीव वेतनाची थकबाकी रोखीने देण्याची कार्यवाहीदेखील 30 जून 2018 पर्यंत करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com