पंढरपूर LIVE 27 Jun 2018
पंढरपुर नगरपरिषद कामगार संघटनेच्या वतीने नगरपरिषद कर्मचा-यांच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन
मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना देऊन सदरच्या मागण्या दिनांक २७-०६-२०१८ पर्यत मागण्या मान्य न
झाल्यास आंदोलन करण्याच्या इशारा देण्यात आला होता.त्यानुसार आज नगरपरिषद कामगार संघटनेचे
अध्यक्ष महादेव अदापुरे कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे जनरल सेक्रटरी सुनिल वाळुजकर सहा.कार्याध्यक्ष
शरद वाघमारे उपाध्यक्ष किशोर खिलारे,संतोष सर्वगोड,जयंत पवार,अनिल गोयल या शिष्टमंडळाबरोबर
मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी चर्चा केली व नगरपरिषद कर्मचा-याना थकित असलेला निवडणुक भत्ता
व कार्तिकी यात्रा अलौन्स देण्याचे मान्य केले तसेच कर्मचा-यांना यापुर्वी १२ वर्षाची आश्वासित प्रगती योजना
लागु केली असुन ज्या कर्मचा-याची सेवा २४ वर्ष पुर्ण झाली आहे अशा कर्मचा-यांना शासनाने नुकत्याच
काढलेल्या परिपत्रकांनुसार आश्वासित प्रगती योजना लागु करण्याची मागणी मान्य करण्यात आली तसेच सन
२०१६ पासुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना सेवानिवत्ती नंतर उपदानाची व प्रां.फंडाची रक्कम अदा
केलेली होती परंतु रजा वेतनाची रक्कम देण्यात आलेली नव्हती त्यामुळे सन २०१६ ते ३१ मे २०१८ अखेर
सेवानिवृत्त झालेल्या सर्व सफाई व इतर कर्मचा-यांच्या रजा वेतनाची रक्कम अदा करावी अशी मागणी करण्यात
आली होती,त्यावर चर्चा होऊन मार्च २०१७ अखेर सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचा-यांची रजा वेतनांची रक्कम
त्वरित देण्याचे मान्य करून ३१ मे २०१८ अखेर सेवानिवृत्त कर्मचा-यांना जुलै २०१८ अखेर सर्व रक्कम अदा
केली जाईल असे आश्वासन दिले,पंढरपुर नगरपरिषदेमधील कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या ज्या कर्मचा-यांना
स्वतच्या मालकीचे घर नसल्यास अशा कर्मचा-यांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत कर्मचां-यांची स्वतंत्र
वसाहत निर्माण करून त्यातील घरे देण्याचे मान्य केले,नगरपरिषदेच्या कर्मचा-यांच्या शासन निर्णयानुसार
विमा उतरविण्याबाबत सर्वसाधारण सभेने मंजुरी दिलेली असुन त्या झालेल्या ठरावाची अमलबजावणी करावी
अशी मागणी करण्यात आली होती.त्याप्रमाणे नगरपरिषदेचा ५० टक्के हिस्सा व कर्मचा-यांचा ५० टक्के हिस्सा
घालुन कर्मचारी व कर्मचा-यांच्या कुटुंबीयांचा सुद्धा विमा उरविण्याचा निर्णय या बैठकित घेण्यात आला तसेच
शासनाकडुन नगरपरिषदेमध्ये संवर्ग कर्मचा-यांची नियुक्ती केली जाते.अशा कर्मचा-यांचे त्यांचे
सेवाकालावधीतील उपदान व रजा वेतनांची रक्कम शासनाकडे भरण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेण्यात
आला.कर्मचा-यांच्या मागण्याबाबत मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सकारात्मक भुमिका घेत सर्व मागण्या
मान्य केल्याने संघटनेचे अध्यक्ष महादेव अदापुरे आभार व्यक्त केले.यावेळी सुनिल बोडके,प्रितम येळे,सुखदेव
माने संजय माने धनंजय वाघमारे,दत्ता चंदनशिवे,,दर्शन वेळापुरे ,पोपट जाधव,शिवाजी बहिरे
,पराग डोंगरे,चिदांनद सर्वगोड,नागनाथ तोडकर,दास अंबुरे,श्रीशैल्य चाबुकस्वार,हे उपस्थित
होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com