👁 3 Views

कर्मयोगी अभियांत्रिकीमध्ये रोहन परिचारक यांचा वाढदिवस विविध उपक्रमानी साजरा. १६१ जणांचे रक्तदान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पेपर-पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धां

Pandharpur Live News : श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांचा वाढदिवस कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालय शेळवे येथे विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यामध्ये रक्तदान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानून २४ मे रोजी कम्प्युटर सायन्स विभागातर्फे रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपली सामाजिक जबाबदारी ओळखून महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामध्ये सुमारे १६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

त्यानंतर दुसर्‍या दिवशी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे प्रथम व तृतीय वर्षामध्ये विद्यापीठाच्या परीक्षेमद्धे प्रत्येक विभागातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पारितोषिक देण्यात आले.

तिसर्‍या दिवशी २७ मे रोजी मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी महाविद्यालयामधील सुमारे शंभर विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

सदरच्या सर्व कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, तसेच विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *