मुंबई 5 :
मुंबई येथे आज विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार मा.प्रशांतराव परिचारक यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडला. शपथविधीचे कार्यक्रमानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचे नवनिर्वाचित आमदार मा.प्रशांतराव परिचारक यांनी विधिमंडळाचे आवारामध्ये असलेल्या भारतीय जनता पक्षाचे कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या बैठकीत सोलापूरचे आराध्य दैवत असलेल्या सिध्देश्वर यात्रेतील अडचणीबाबत प्रश्न उपस्थित केले, तसेच यात्रेबाबत चालू असलेल्या आंदोलनाने तीव्र स्वरूप घेत आहे, तेंव्हा याबाबत योग्य तो तोडगा त्वरीत काढावा अशी मागणी केली.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सिध्देश्वर देवस्थानची यात्रा निर्वघ्नपणे व उत्साहात पार पडावी यासाठी तत्काळ बैठक आयोजित करून उद्या संध्याकाळपर्यंत सर्वसमावेशक तोडगा काढणेचे
आश्वासन दिले आहे.
यावेळी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीष बापट, सोलापूर जिल्ह्याचे
पालकमंत्री विजय देशमुख, आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील, भाजपा प्रवक्ते माधव भंडारी, सुधाकरपंत परिचारक आदी मान्यवर उपस्थित होते.