पंढरपूर लाईव्ह:-
दि. 6 जानेवारी 2015 रोजीच्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून पंढरीतील सामाजिक कार्यकर्ते व येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान चे संस्थापक डी.राज सर्वगोड यांनी येथील फत्रकारांना आकर्षक शुभेच्छा कार्ड भेट देत पत्रकारदिनानिमित्त शुभेच्छा संदेश दिला आहे.
डी.राज सर्वगोड हे नेहमीच विविध सामाजिक कार्यात हिरीरिने सहभागी होत असतात. तसेच विविध महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवितात. तसेच ते विविध विशेष दिवशी संबंधीत क्षेत्रातील व्यक्तींना व प्रतिभावंतांना गौरवित असतात. त्यांनी दिलेल्या या आकर्षक, भावनाप्रधान व सुबक शुभेच्छा कार्डामुळे पत्रकार बांधव आनंदी झाले आहेत.