सोलापूर : शहरातील विडी घरकूल परिसरातील सुमित प्रोव्हिजन स्टोअर्समधून एका इसमाने 72 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पळविले. ही घटना मंगळवारी घडली.
वसंत यणगन यांच्या फिर्यादीवरून एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यणगन यांच्या दुकानात येऊन या इसमाने ऊदबत्ती पुडा मागितला. त्यावेळी यणनग हे इसमाला ऊदबत्ती पुडा देत असताना त्याने त्यांची नजर चुकवून दुकानाच्या गल्ल्यातील 72 हजार रुपयांचे दागिने पळविले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.