पंढरपूर लाईव्ह वृत्त(प्रतिनिधी)
पंढरपूर येथील भादुले चौकानजीक काल दि.6 जानेवारी 2015 रोजी रात्री सोमनाथ टाकणे या युवकाची हत्या झाली. मयताचे डोळ्यात मिरचीची पुड टाकून त्याचे डोक्यावर, तोंडावर, कपाळावर, नाकाचे खाली, डावे खांद्यावर आदी ठिकाणी कोयत्याने वार करुन त्याची हत्या केली. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात येथील भोसले चौकातील 13 जणांवर व अन्य 3 ते 4 अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील 4 आरोपींना पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली होती त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधिशांनी या चौघांनाही दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अन्य चारजणांना आज पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सोमनाथ बाळकृष्ण टाकणे (वय31) रा. 4242 दाळे गल्ली, पंढरपूर या युवकाचा दि. 6 जानेवारी 2015 रोजी येथील भादुले चौकानजीक असलेल्या भगवंत कृषी केंद्रासमोर रात्री 8:20 वाजणेच्या सुमारास हत्या झाली. या घटनेमुळे पंढरपूर शहरात सर्वत्र तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथे सौदामिनी सोमनाथ टाकणे (24) रा. दाळे गल्ली यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी खालील 13 जणांवर व अन्य अज्ञात 3-ते 4 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पृथ्वीराज अनिल भोसले, विशाल किरण भोसले, विश्वजीत सुनील भोसले, किरण विठ्ठल भोसले, संदीप अनिल भोसले, वैभव शहाजी भोसले, अभय शहाजी भोसले, शैलेश उर्फ शैलेंद्र शहाजी भोसले, दिनेश प्रकाश भोसले, निलेश प्रकाश भोसले, प्रसाद शशिकांत भोसले, प्रविण शशिकांत भोसले,
नागेश आण्णासाहेब भोसले (सर्व रा.भोसले चौक, पंढरपूर) आदींची नांवे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आलेली आहेत.
पोलिसांनी पृथ्वीराज अनिल भोसले, शैलेश शहाजी भोसले, प्रसाद शशिकांत भोसले, प्रविण शशिकांत भोसले यांना अटक करुन कोर्टात हजर केले असता न्यायमुर्तींनी या चौघांना 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आज पोलिसांनी चौकशीसाठी संदीप संदीप अनिल भोसले, निलेश प्रकाश भोसले, दिनेश प्रकाश भोसले, अभय शहाजी भोसले यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळते.
यातील अन्य आरोपींचा शोधही पोलिस कसून घेत असून लवकरच या प्रकरणाचा छडा लावु अशी माहिती पोलिस निरीक्षक श्री.नावंदे व श्री.देशमुख यांनी दिली.